Headlines

समान नागरी कायद्याला विरोध केल्यास खलास करू:आमदार इद्रिस नायकवडी यांना जीवे मारण्याची धमकी, मिरजमध्ये गुन्हा दाखल




समान नागरी कायद्यावर घेतलेल्या आक्रमक राजकीय भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानपरिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांना अज्ञाताकडून पत्राद्वारे थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. समान नागरी कायद्याला विरोध केल्यास तुम्हाला खलास करू, अशा स्पष्ट शब्दांत पत्रातून ही धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही आमदार नायकवडी यांनी समान नागरी कायद्याला उघडपणे विरोध दर्शवला होता. गेल्याच महिन्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करण्याची आग्रही मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याशी संबंधित विधेयक मांडले जाण्याची शक्यता असल्याने, पक्षाने यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, असा आग्रह त्यांनी या पत्रातून धरला होता. मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल पक्षाकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच आमदार नायकवडी यांना हे धमकीचे पत्र मिळाले. याप्रकरणी त्यांनी तातडीने मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आमदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा नोंदवला असून, हे पत्र कोणी आणि कुठून पाठवले, याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. माझ्यावर प्रत्यक्ष हल्ल्याचाही प्रयत्न- नायकवाडी आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले की, धमकीचे पत्र मिळाल्यानंतर मी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत माझ्यावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला होता. सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करत असताना असे प्रकार घडत असतात. मात्र, थेट जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे या षड्यंत्रामागे नेमके कोण सूत्रधार आहेत, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे ही वृत्त वाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये आज काँग्रेसचा एल्गार:दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भव्य जनआक्रोश दुष्काळ मोर्चा
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या, शेतीचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या हक्कांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसकडून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’ काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात आवाज उठवून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *