Headlines

शेफ विष्णू मनोहर यांना इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निमंत्रण:तेल अवीवमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार




नागपूरचे शेफ विष्णू मनोहर नोव्हेंबरमध्ये इस्रायलमधील तेल अवीव येथे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना पाककला व सांस्कृतिक परिसंवादासाठी आमंत्रित केले आहे. भारतातून निवड झालेल्या दोन शेफपैकी ते एक आहेत. ‘क्युरेटेड कलिनरी अँड कल्चरल एंगेजमेंट’ या परिसंवादात मनोहर भारतीय खाद्यपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा मांडतील, ज्यामुळे भारतीय खाद्यसंस्कृतीला जागतिक ओळख मिळेल. चार दशकांच्या प्रवासात मनोहर यांनी ५५ पुस्तके लिहिली, ५ हजारांहून अधिक पाककला कार्यक्रम केले आणि ३५ जागतिक विक्रम नोंदवले. त्यांनी अमेरिकास्थित ‘शेअर अवर स्ट्रेंथ’ संस्थेसोबत भारतात ४ कोटींहून अधिक भोजनांसाठी निधी गोळा केला आहे. त्यांना अमेरिकेतील सांता क्लारा काउंटीने गौरवले असून, ‘विदर्भ भूषण’ पुरस्कारही मिळाला. अमेरिकेचे माजी महावाणिज्यदूत एडगार्ड डी. कॅगन यांनीही त्यांच्या ‘विष्णुजी की रसोई’ येथील आदरातिथ्याबद्दल आभार मानले होते. ——- हेही वाचा.. पाण्याची पातळी फक्त विदर्भातच कमी होते का?:5 जिल्ह्यांतील बोअरवेल बंदीवरून असोसिएशनचा सरकारला सवाल, अटींसह परवानगी देण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने बोअरवेल खोदण्यावर बंदी घातली आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला ‘बोअरवेल असोसिएशन’ने तीव्र विरोध दर्शवला आहे. पाण्याची पातळी फक्त विदर्भातच कमी होतेय का? मराठवाडा आणि खान्देशमध्ये नाही का?” असा सवाल करत, या बंदीमुळे विदर्भातील तब्बल ३ कोटी जनतेला फटका बसेल, अशी भीती असोसिएशनने व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *