- Marathi News
- National
- As Gold Becomes More Expensive, Wedding Jewellery Is Now Priced In Rupees, Not Tola; Buying Trends Have Changed In Ahmedabad, Kolkata, Jaipur
अहमदाबादहून मंदार दवे, जयपूरहून प्रमोदकुमार शर्मा, कोलकाताहून बबिता माली यांचा रिपोर्ट4 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

फाइल फोटो
लग्नात मुलीला किती तोळे सोने द्यायचे, आता याऐवजी किती रुपयांचे दागिने द्यायचे हे कुटुंबे ठरवत आहेत. सणासुदीलाही दागिन्यांची खरेदी अशाच प्रकारे ठरत आहे. सोन्याच्या महागाईने देशातील सराफा बाजारात खरेदीची पद्धत बदलून टाकली आहे. घरात किंवा लॉकरमधील जुने दागिने बाजारात येत आहेत. जड हार हलके झाले आहेत आणि लग्नाच्या संपूर्ण सेटमधून बांगड्या कमी होत आहेत.
अहमदाबाद, जयपूरमध्ये सुमारे ७०% ग्राहक जुने सोने बदलून नवीन दागिने घेत आहेत. कोलकात्यात २५ ते ४० ग्रॅमचे हार १०-१२ ग्रॅममध्ये बनवले जात आहेत. सोने खरेदीचे वजन घटत आहे. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर १,६५५ रुपयांनी वाढून १,४९,२२० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. चांदी २.१५ लाख रुपये प्रतिकिलो राहिली. वाचा देशातील ३ प्रमुख ज्वेलरी बाजारांतून दिव्य मराठी रिपोर्ट…
८०% लोकांची हलक्या दागिन्यांना पसंती
अहमदाबाद : हलक्या दागिन्यांचा बाजार ५०-७०% वाढला
जुने दागिने नवीन खरेदीचा आधार बनत आहेत. व्यापारी सांगतात, ७०% दागिने खरेदीत जुने सोने वापरले जात आहे. नवीन पिढीला आधुनिक, हलके दागिने हवे आहेत. त्यामुळे ब्रेसलेट, पेंडंट, साखळीची मागणी वाढली. सोने महाग होण्याच्या भीतीपोटी ॲडव्हान्स बुकिंग वाढले आहे. गेल्या आठवड्यात भाव कमी झाल्यानंतर लग्नाची बुकिंग २०-२५% वाढली. पुष्य नक्षत्र, धनत्रयोदशीसाठीही बुकिंग करत आहेत.
कोलकाता : निम्म्याहून अधिक ग्राहक जुने सोने बदलत आहेत
ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे संचालक समर डे सांगतात, निम्म्याहून अधिक ग्राहक जुने सोने बदलत आहेत. ८०% हून अधिक लोक हलक्या दागिन्यांना पसंती देत आहेत. नोकरदार महिला एका जड हाराऐवजी ४-५ छोटे दागिने पसंत करतात. सराफ विशाल सोनी सांगतात की, आधी १० लाखांत गळ्यातील, कानातील, हातातील दागिन्ये तयार व्हायचे. आता बांगड्यांसाठी बजेट वाढले.
जयपूर : १० तोळ्यांचे वचन नाही, आता १० लाखांचे बजेट
सोन्याचे दर एक लाख रुपयांच्या वर गेल्यानंतर लग्नाच्या खरेदीचे गणित बदलले. कुटुंबे आता सांगत आहेत की १० लाख रुपयांचे दागिने द्यायचे आहेत, वजन काहीही असो. सराफा ट्रेडर्स कमिटीचे अध्यक्ष कैलास मित्तल सांगतात, इथेही ७०% ग्राहक जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन दागिने घेत आहेत. हलक्या डिझाइनसह १८-२० कॅरेटच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे.
भास्कर एक्स्पर्ट: अजय केडिया, डायरेक्टर, केडिया ॲड.
तेजीची अपेक्षा, घसरण झाल्यास खरेदी करा
- सोने विक्रमी पातळीवरून १५% खाली आहे. चांदीने या वर्षातील वाढ गमावली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तेजीनंतर सोन्यातील दरांच्या दुरुस्तीचा मोठा भाग पूर्ण झाला आहे.
- मध्यवर्ती बँकांची खरेदी : मध्यवर्ती बँकांची सोन्याची वाढती आवड मागणीला बळ देईल.
- गुंतवणूकदारांचा कल : शेअर बाजारातील कमकुवत परताव्यामुळे निराश झालेले गुंतवणूकदार सोने-चांदीच्या ईटीएफकडे वळले आहेत.
- व्याजदर : रशियाकडून डिझेल खरेदीबाबत ट्रम्प यांच्या कराराने ऊर्जेचे दर घटले तर महागाईचा ताण कमी होईल.

