Headlines

China bans Indian tunneling equipment citing national security, new rules from 18 Nov; Fears of impact on India’s infrastructure projects


  • Marathi News
  • National
  • China Bans Indian Tunneling Equipment Citing National Security, New Rules From 18 Nov; Fears Of Impact On India’s Infrastructure Projects

नवी दिल्ली/बीजिंग9 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करत बोगदे खोदणाऱ्या ‘टनल बोरिंग मशिन्स’सह (टीबीएम) अनेक अवजड यंत्रांच्या भारतातून निर्यातीवर नवे निर्बंध लादले आहेत. यामध्ये डोंगराळ भागात खोदकाम करणारी आणि अतिउंचीवर काँक्रीट फवारणी करणारी उपकरणे समाविष्ट आहेत. नद्या तसेच समुद्राच्या तळाशी गाळ आणि माती उपसणाऱ्या मशिन्सच्या काही सुट्या भागांवरही बंदी असेल. हे नवे नियम १८ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

आता चिनी कंपन्यांना यंत्रे पाठवण्यापूर्वी सरकारी परवाना घ्यावा लागेल. ही यंत्रे नेमक्या कुठे व कोणत्या कामासाठी वापरत आहेत, याची चीन तपासणी करेल. सरकारी मंजुरी मिळाल्यानंतरच निर्यात करता येईल. कागदपत्रांवर संशय आल्यास सीमाशुल्क विभाग तपास पूर्ण होईपर्यंत पुरवठा रोखू शकेल. यामुळे भारतातील मेट्रो, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि सीमावर्ती भागातील बोगदे निर्मितीच्या प्रकल्पांना विलंब होण्याची शक्यता आहे.

बुलेट ट्रेनच्या दोन ‘टीबीएम’च्या पुरवठ्याला १७ महिने उशीर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जर्मन कंपनी ‘हेरेन्क्नेख्ट’ने चीनमध्ये ३ टीबीएम तयार केल्या होत्या. यातील २ मशिन्स ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारतात येणे अपेक्षित होते. मात्र चिनी कस्टमकडून त्यांना मंजुरी मिळाली नाही. जून २०२५ पर्यंत तिन्ही मशिन्स अडकून पडल्या होत्या. हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयापर्यंत पोहोचले. मार्च २०२६ मध्ये दोन यंत्रांची पहिली खेप मुंबईत दाखल झाली. जुलै महिन्यापासून या दोन्ही यंत्रे खोदकाम करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *