Headlines

तीन कर्जमाफी झाल्या तरी माझं नाव‎आलं नाही म्हणून आत्महत्या करतोय:नांदेड तालुक्यातील बोरगाव तेलंग येथे व्हिडिओ काढून शेतकऱ्याची आत्महत्या‎



कर्जमाफीच्या तीन याद्यांमध्ये पात्र असूनही ‎‎नाव आले नाही, तसेच मुलीची शैक्षणिक‎‎फी माफ झाली नसल्याने ‎‎‎आर्थिक अडचणींचा‎‎सामना करावा लागत‎‎ आहे, असा व्हिडिओ‎‎काढून शेतकऱ्याने‎‎गळफास घेऊन‎‎आत्महत्या केली. नांदेड ‎‎‎तालुक्यातील बोरगाव‎तेलंग येथे सोमवा

.

नांदेड शहरापासून सुमारे १५ किलोमीटर‎अंतरावर असलेल्या बोरगाव तेलंग येथील‎शंकर क्षीरसागर यांच्याकडे पाच एकर‎जमीन आहे. नापिकीमुळे आर्थिक संकट‎निर्माण झाले असताना राज्य सरकारने‎जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभही‎मिळाला नसल्याची व्यथा त्यांनी‎व्हिडिओतून मांडली होती.‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मुलगी एमबीबीएसला, मुलगा‎ अभियांत्रिकीला

क्षीरसागर यांची मुलगी‎ पुण्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात‎ एमबीबीएसचे, तर मुलगा अभियांत्रिकीचे‎शिक्षण घेत आहे. दोन्ही मुलांच्या‎शिक्षणाचा खर्च, शेतीतील नापिकी आणि‎कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने निर्माण‎झालेल्या आर्थिक अडचणींच्या‎पार्श्वभूमीवर त्यांनी हे टोकाचे पाऊल‎उचलले.

व्हिडिओतील संवाद असा

हॅलो! कलेक्टर साहेब, मी विनंती करत आहे.‎तीन कर्जमाफी झाल्या तरी एकाही कर्जमाफीत‎माझं नाव आलं नाही. त्या निमित्तानं मी‎आत्महत्या करतोय. शासनानं माझी गांभीर्यानं‎दखल घ्यावी. शासन म्हणतं फी माफ आहे,‎माझी मुलगी शिवानी शंकर क्षीरसागर‎मेडिकलला आहे. कलेक्टर साहेबांना मी विनंती‎करतो, गांभीर्यानं याची चौकशी करावी. मी‎शेतकरी म्हणून आत्महत्या करतो. मी‎तुमच्यासारखाच आहे… चालतो.‎‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *