![]()
प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ फुटबॉल खेळून कारमधून बाहेर पडत असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात कुटुंबाचा एकमेव आधार असलेला यूट्यूबर उमेश चौहान रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. सुदैवाने गोळी हृदय, फुफ्फुस आणि आतड्यांना चाटून लिव्हरजवळून गेल्याने उमेशचा जीव काही मिलिमीटरच्या अंतराने थोडक्यात वाचला. आठ महिन्यांची गर्भवती पत्नी, पाच वर्षांचा मुलगा आणि उत्तर प्रदेशातील खेड्यात राहणारे वृद्ध आई-वडील यांचा आधार असलेला उमेश सध्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहे. डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितल्याने कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. याच घटनेत टायगरचा चालक फिरदोस नानावटी याच्याही हाताला गोळी लागली असून दोघांवर शस्त्रक्रिया होणार आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. पुष्प नर्सरी पार्क तात्काळ बंद करण्यात आले असून सार्वजनिक शौचालयालाही टाळे ठोकण्यात आले आहे. परिसरातील हातगाड्या, टपऱ्या आणि फुटपाथवरील दुकानांवर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. २ ते ३ मिनिटांत खेळ “सायंकाळी ७ च्या सुमारास टायगर गाडीतून बाहेर येत असताना मोठी गर्दी झाली. अचानक फटाके फुटल्यासारखे आवाज आले आणि ‘टायगरवर गोळीबार झाला’ असा आरडाओरड सुरू झाला. चालक रक्तबंबाळ झाला होता. लोकांनी आरोपींच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार अवघ्या दोन ते तीन मिनिटांत घडला. कृष्णकुमार झा, व्यावसायिक आम्ही थोडक्यात वाचलो “मी टायगर श्रॉफचे चित्रीकरण कव्हर करण्यासाठी आलो होतो. फुटबॉल खेळून टायगर बाहेर पडताच गोळीबार झाला. यात माझा सहकारी उमेश याला गोळी लागली. आम्ही तातडीने त्याला रुग्णालयात हलवले. पोलिसांनी चौकशीसाठी रात्रभर बसवून ठेवले होते. आम्ही अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावलो. -किसन रामभर, यूट्यूबर / प्रत्यक्षदर्शी ‘सर्वसामान्यांचे उद्यान केवळ श्रीमंतांच्या मनोरंजनासाठी?’ या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पूर्वी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुले असणारे हे उद्यान आता केवळ श्रीमंत आणि सेलिब्रिटींच्या शूटिंगसाठी वापरले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. “हे उद्यान मुलांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी होते. आता मात्र सामान्यांना प्रवेश नाकारून सेलिब्रिटींच्या शूटिंगसाठी दरवाजे उघडले जातात.’ क्षणात भयंकर घडले: उमेश उमेश चौहान म्हणाला, सायंकाळी छाती आणि पोटाचा सीटी स्कॅन झाला. गोळीने अवयवांना मोठा धक्का न लावल्याने धोका टळला आहे. रुग्णालयातील बेडवरून बोलताना उमेश म्हणाला, ‘मी आता बरा आहे. त्या क्षणी नेमके काय झाले ते कळलेच नाही. अचानक गोळी लागली.’ उमेशच्या घरात चिंतेचे सावट कुटुंब: ८ महिन्यांची गर्भवती पत्नी, ५ वर्षांचा मुलगा (राहणार: मानखुर्द).
मूळ गाव: आई-वडील उत्तर प्रदेशातील खेड्यात शेती करतात.
उपजीविका: यूट्यूबवरील व्हिडिओंवर संपूर्ण घराचा उदरनिर्वाह.
जखम: गोळी छाती, फुफ्फुस व लिव्हरजवळून स्पर्श करत आरपार.
उमेश चौहानवर उपचार सुरू आहेत
Source link
हृदय अन् फुफ्फुसाला चाटून गोळी गेली; उमेशची केईएममध्ये मृत्यूशी झुंज:टायगरच्या शूटिंगसाठी गेलेला यूट्यूबर गोळीबारात गंभीर जखमी