Headlines

दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदे काय बोलणार?:शेतकरी मदत ते 500 कोटींच्या आरोपापर्यंत, नेस्को मैदानावरील सभेकडे लक्ष




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा आज गोरेगाव येथील नेस्को मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिंदे कोणती राजकीय भूमिका मांडतात, तसेच विरोधकांच्या आरोपांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाचा हा मेळावा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित न ठेवता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीशी जोडण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही राज्यातील कोरड्या दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारने तातडीने ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याशिवाय, शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे शेकडो ट्रक आज रवाना करण्यात आले आहेत. शेतकरी कुटुंबांतील मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसैनिक उचलतील, असा मोठा दिलासाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मेळाव्याच्या माध्यमातून सरकारची ही जनहिताची कामे आणि भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. ५०० कोटींच्या आरोपावरून जरांगेंचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान याच दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधून उपमुख्यमंत्री शिंदेंना थेट आव्हान दिले आहे. “५०० कोटींचा आरोप खरा की खोटा, याचे आजच्या दसरा मेळाव्यात किंवा उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर उत्तर द्या,” अशी मागणी जरांगेंनी केली आहे. याशिवाय, “दुष्काळात पिके जळून खाक झाली असताना सरकार अवघे ५,००० रुपये देऊन बळीराजाची क्रूर चेष्टा करत आहे. या रकमेत शेतकऱ्यांचा बँकेच्या फेऱ्या मारण्याचा खर्चही निघणार नाही. राज्य सरकारने हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमुक्ती दिलीच पाहिजे, अन्यथा सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून तीव्र लढा उभारू,” असा इशाराही जरांगेंनी दिला आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षाचे शक्तिप्रदर्शन, नेस्को मैदानावरील कार्यकर्त्यांची गर्दी, शेतकरी मदतीचा अजेंडा आणि जरांगेंच्या आव्हानावर उपमुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर या सर्व मुद्द्यांमुळे आजचा दसरा मेळावा अत्यंत स्फोटक ठरण्याची शक्यता आहेत. ————— ही बातमी पण वाचा.. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही:दसरा मेळाव्याआधी शिंदेंचा मोठा निर्णय; शेकडो ट्रक दुष्काळग्रस्त भागात रवाना
यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” असा शब्द देत शिवसेनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागासाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे शेकडो ट्रक आज रवाना करण्यात आले. तसेच, शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जबाबदारीही शिवसेना घेणार असल्याचे एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *