Headlines

पोलिस असल्याची बतावणी करत 2भामट्यांनी एका प्रवाशाची सोन्याची अंगठी पळवली:आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




आम्ही पोलिस असून दोन दिवसांपुर्वी डिटोनेटर सापडले त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून सर्वांचीच चौकशी सुरु असून तुमची तपासणी करावयाची आहे असे सांगत दोन भामट्यांनी एका प्रवाशाची 9 ग्राम वजनाची सोन्याची अंगठी पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 20 सायंकाळी दोन भामट्यां विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम येथील व्यापारी संतोषकुमार लढ्ढा हे सोमवारी ता. 19 वाशिम येथून वारंगाफाटा मार्गे हदगावकडे नातेवाईकाकडे कार्यक्रमासाठी निघाले होते. दुपारच्या सुमारास ते वारंगाफाटा येथे उतरले असतांना एका दुचाकीवर आलेल्या तरुणाने त्यांना बोलावले. आम्ही पोलिस आहोत असे सांगत बनावट कार्ड काढून दाखविले. दोन दिवसांपुर्वी याभागात डिटोनेटर सापडले आहेत त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून सर्वांची चौकशी केली जात आहेत. त्यानुसार तुमची तपासणी करायची आहे असे सांगितले. दरम्यान, पोलिस विभागाचे कार्ड दाखविल्यामुळे संतोषकुमार यांना त्यांच्यावर विश्‍वास बसला. त्यांनी खिसे काढून दाखवली. त्यातून अडीच हजार रुपये व एक डायरी भामट्यांनी पाहिली तसेच त्यांच्या हातातील 9 ग्राम वजनाची सोन्याची अंगठी घेतले अन सर्व वस्तू रुमालात गुंडाळून दिल्या. सदर रुमाल चार दिवस उघडून पाहू नका, काही गोष्टी समजून घ्या असा सल्लाही दिला. मात्र काही वेळानंतर संतोषकुमार यांनी रुमाल उघडून पाहिल्यानंतर त्यात पैसे व डायरी होती मात्र अंगठी गायब झाल्याचे दिसून आले. त्यांनी भामट्यांचा शोध घेतला मात्र ते पसार झाल्याचे दिसून आले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.यावरून पोलिसांनी दोन भामट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शरद मरे, जमादार बालाजी जोगदंड, राजू ठाकूर पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *