Headlines

Manoj Jarange Patil Vs Ramdas Kadam; 500 Crore Controversy In Maharashtra


“दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमच्यावर ओरडणारे आणि बाप दाखवायची भाषा करणारे नेते आता कितीही थयथयाट करत असले, तरी उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजपमधील ती सर्व कुजबुज पुराव्यासह महाराष्ट्रासमोर मांडणार आहे. या 500 कोटींच्या

.

बीडच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजप नेत्यांकडून 500 कोटी रुपये घेऊन ते श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगेंना दिल्याचा संशय उपस्थित केला होता. यावर रात्री मुंबईतील नेस्को सेंटरमधील दसरा मेळाव्यातून शिवसेना नेते रामदास कदम यांनी जरांगे यांच्यावर “बाथरूममध्ये जाऊन गुपचूप खातात, त्यांची संपत्ती तपासा आणि बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला” असा घणाघाती हल्ला चढवला होता. या टीकेला एका वृत्तवाहिनीशी सविस्तर संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत उत्तर दिले.

रामदास भाईंबद्दल आदर, पण उद्या 11 वाजता बाप दाखवतो अन् श्राद्धही घालतो!

रामदास कदम यांच्या विधानाचा समाचार घेताना जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही लहान असताना रामदास भाई भगव्यासाठी कसे लढायचे हे ऐकत आलो आहोत. त्यामुळे त्यांच्यावर वैयक्तिक चिखलफेक करण्याची माझी इच्छा नाही. मात्र, पक्षाच्या नेत्याची री ओढण्यासाठी ते ज्या पद्धतीने अस्वस्थ आणि बेचैन होऊन बोलले, त्याचे उत्तर देणे भाग आहे. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ असे ते म्हणाले; मग उद्या सकाळी 11 वाजता हा सूर्य आणि हा जयद्रथ दाखवून देतो.”

500 कोटींची कुजबुज कुठून आली?

“शिंदे साहेबांनी स्वतः भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांना सांगितले नसते, तर भाजपच्या अंतर्गत वर्तुळात ही चर्चा कशी रंगली असती? मी साधा प्रश्न विचारला होता की, ‘तुम्ही भाजपला असे सांगितले आहे का, आणि ते पैसे मला दिले आहेत का? दिले असतील तर हो म्हणा, नसतील तर नाही म्हणा.’ यावर एवढा त्रागा करण्याचे कारण काय होते? ‘पुरावे द्या’ असे म्हणत त्यांनीच स्पष्ट केले की पैसे दिले नाहीत.”

दोन माजी मुख्यमंत्र्यांची नावे, उद्या 11च्या नंतर तुम्ही शोधा!

या कथित आर्थिक देवाणघेवाणीच्या मागे फार मोठा राजकीय कट असल्याचा दावा करत त्यांनी गौप्यस्फोट केला. “या संपूर्ण कुजबुजीत दोन माजी मुख्यमंत्र्यांची नावे आहेत. ज्या पद्धतीने संभाषण घडले आहे, त्यात एका मोठ्या नेत्याचा आणि शुद्ध व्याकरण वापरणाऱ्या हिंदी-मराठी भाषिक नेत्यांचा समावेश आहे. मला संपवण्यासाठी आणि मराठ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी हे षड्यंत्र रचले गेले. उद्या सकाळी 11 वाजता मी मराठा समाजासमोर हे सर्व मांडणार आहे; त्यानंतर दिल्लीतले कोण आणि महाराष्ट्रातले कोण, हे तुम्हीच शोधून काढा.”

सामंत आणि म्हस्केंना उत्तर

“उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की पुरावे असतील तर द्यावेत. सामंत साहेब, उद्या 11 वाजता महाराष्ट्रापुढे हा विषय मांडतो. खासदार नरेश म्हस्के म्हणतात मोठ्या नेत्यावर विचार करून बोलावे; पण आमचे आहेत म्हणूनच आम्ही त्यांना मोठे केले. पवार साहेबांचे वय झाले आणि अजितदादा नाही, त्यामुळे आपला माणूस म्हणून मराठ्यांनी त्यांना डोक्यावर घेतले; पण त्यांनीच जर समाजाचे आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली, तर गप्प बसायचे का?”

माझी सुरक्षा काढली तरी फरक पडत नाही; गरीब मराठा माझी ढाल!

आपल्या सुरक्षेबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर त्यांनी संताप व्यक्त केला. “माझ्या बंदोबस्ताच्या गाड्या काल रस्त्यावरून मागे घेण्यात आल्या. मी 6 ते 8 महिन्यांपूर्वीच अर्ज दिला होता की माझी शासकीय सुरक्षा काढून घ्या, मला त्याची गरज नाही. माझ्यासोबत चालणारा लाखो मराठा समाज हीच माझी खरी सुरक्षा आहे. गरिबांच्या लेकरांवर खोट्या केसेस टाकणे आणि चौकशी लावण्याची भाषा करणे ही तुमची मर्दानगी आहे का? आम्ही 22 ते 23 वर्षांपासून संघर्षाच्या मैदानात लढत आहोत, आम्ही लेचेपेचे मराठे नाही.”

सत्तेचा गैरवापर समाजाला संपवण्यासाठी

“माझा समाज शेतात चिखलात काम करतो, त्याचे कपडे मळलेले असतात, त्याच्या घामाचा वास येतो; पण त्या गरिबाच्या लेकरांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून त्यांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्याचे पाप तुम्ही केले. 15 दिवसांत देतो म्हणाले होते, आज 2.5 महिने झाले तरी प्रमाणपत्रे दिली नाहीत. ही चूक झाकण्यासाठीच अभ्यासक आणि प्रवक्ते पुढे करून आमच्यावर भुंकवले जात आहे.” उद्या सकाळी 11 वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषदेत काय कागदपत्रे किंवा माहिती जाहीर करतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे आणि विशेषतः सत्ताधारी महायुतीचे लक्ष लागले आहे.

—————————————————

हेही वाचा…

अमित शहाच लॉरेन्स बिश्नोईचे खरे सूत्रधार!:संजय राऊतांचा पुन्हा आरोप; म्हणाले- 500 कोटींवरून शिंदेंना EDने समन्स पाठवावे, हरदीप पुरींच्या फोटोंवरून ‘रेझिम चेंज’चा पुनरुच्चार

“देशभरातील गुन्हेगारी टोळ्या आणि माफियांचे जाळे भारतीय जनता पक्षाच्या छत्राखाली आणण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. गुजरातच्या साबरमती तुरुंगातून गँग चालवणारा लॉरेन्स बिश्नोई हा केवळ बाहुले असून, त्यामागील खरा चेहरा अमित शहा यांचाच आहे. देशात आता विरोधकांना संपवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगचा वापर राजकीय हत्यांसाठी होऊ शकतो,” असा अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.