![]()
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबारासाठी शस्त्रे आणि पैशांचा पुरवठा थेट हरियाणा, पंजाबमधून झाला, अशी माहिती समोर आली आहे. अमृतसर येथून मुंबईत शस्त्रे आणण्यासाठी हरियाणातील सोनिपत येथील राधा (२३), बबिता (२३) या दोन महिलांचा ‘कुरिअर’ म्हणून वापर करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली. पोलिसांनी हरियाणातील बरोदा गावातून अंकित नावाच्या आरोपीला अटक केली आहे. तो टायगरची सुपारी देणाऱ्या बिष्णोई गँगचा गँगस्टर अनिल पंडितच्या तसेच मुख्य शूटर रेहानच्या संपर्कात होता. त्यानेच शूटर्सना पैसा पुरवला. दरम्यान, टायगरवर गोळ्या झाडणाऱ्या तिन्ही शूटर्सना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी सांगितले, अमृतसरला जाऊन दोन जणांनी रेल्वेतून शस्त्रे आणली होती. दुचाकीच्या मूळ मालकाचा शोध सुरू शूटर्सनी एका मध्यस्थाकडून अवघ्या २५ हजार रुपयांत जुनी दुचाकी खरेदी केली होती. गोळीबारानंतर तिन्ही हल्लेखोर या दुचाकीने अंधेरी स्टेशनला पोहोचले. तेथून ते सुरतकडे रवाना झाले. पोलिस दुचाकीच्या मूळ मालकाचा शोध घेत आहेत. गुन्हेगारांच्या नेटवर्कची पाळेमुळे पोलिस शोधणार तिन्ही शूटर्सना मुंबईच्या किल्ला कोर्टात (एस्प्लनेड कोर्ट) हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी सांगितले की, या हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय ते आंतरराज्य टोळीचे नेटवर्क असल्याचे दिसून येते. या नेटवर्कची पाळेमुळे पोलिसांना शोधायची आहेत. हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय ते आंतरराज्य टोळीचे नेटवर्क टायगरवर हल्ल्यासाठी एक विदेशी आणि एका देशी बनावटीच्या पिस्तुलाचा वापर झाला. गोळीबार केल्यावर तिन्ही हल्लेखोर दुचाकीने अंधेरी स्टेशनला पोहोचले. तिथून लोकलने बोरिवली आणि पुढे रस्त्याने थेट सुरतला पसार झाले. राजस्थानातील कोटा येथे त्यांना अटक करण्यात आली. मुंबईतून पळताना पिस्तुले रस्त्यात फेकून दिल्याची माहिती आरोपींनी दिली. ती पिस्तुले पोलिस शोधत आहेत. डेड लेटर बॉक्स : शस्त्रास्त्र व्यवहाराची नवी पद्धत तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी आणि म्होरक्याची ओळख गुप्त ठेवण्यासाठी टोळीने ‘डेड लेटर बॉक्स’ या नव्या पद्धतीचा वापर केला. यात शस्त्र देणारा आणि घेणारा समोरासमोर कधीच येत नाहीत. यामध्ये पूर्वयोजनेनुसार एका निर्जन ठिकाणी शस्त्रांचा साठा लपवून ठेवला जातो. त्यानंतर शस्त्र घेणाऱ्याला केवळ सांकेतिक संदेशाद्वारे विशिष्ट वेळ व ठिकाण कळवले जाते. ठरलेल्या वेळेत खरेदीदार किंवा शूटर त्या ठिकाणी पोहोचून ती शस्त्रे ताब्यात घेतो. हल्लेखोर किंवा सुपारी देणाऱ्याचा थेट संपर्क किंवा सीसीटीव्ही पुरावा पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी ही क्लृप्ती वापरली गेली.
Source link
टायगर श्रॉफ गोळीबार:टायगरवर गोळीबारासाठी शस्त्रे, पैसा पुरवठा पंजाब, हरियाणातून, 3 शूटर्सना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी