![]()
केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत सुमारे १० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही लाडसावंगीकरांची पाण्यासाठीची पायपीट थांबलेली नाही. योजनेचे काम गेल्या चार वर्षांपासून रेंगाळल्यामुळे सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेल्या
.
शनिवारपासून गावात तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी विहिरीवर पाणी रिकामे करताना आणि टँकरवरून पाणी भरताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. टँकरभोवती होणाऱ्या गर्दीमुळे येथे मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. २०१२ मधील दुष्काळात टँकरमधून पाणी भरताना एका १३ वर्षीय बालकाचा चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. या जुन्या घटनेची आठवण होऊन ग्रामस्थ सध्या भयभीत आहेत. त्यामुळे टँकर पाणीपुरवठ्याच्या काळात सुरक्षेचा आणि योग्य नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
१० कोटी रुपये मंजूर होऊनही आम्हाला टँकरच्या पाण्यावर का राहावे लागत आहे? आणि ही योजना नेमकी कधी पूर्ण होणार?, असा थेट सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
दुसरीकडे, सरपंचपती रमेश शिंदे यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. जर ४५ दिवसांत लाडसावंगीकरांना पाणी मिळाले नाही, तर सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि गावकरी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व पंचायत समितीसमोर तीव्र उपोषण करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
जलजीवन मिशनच्या कामाची मुदत संपून वर्ष उलटले सोमठाणा धरणातून लाडसावंगी गावासाठी थेट पाणी आणण्याची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. यामध्ये सुमारे १५ किलोमीटरची मुख्य जलवाहिनी टाकणे, नवीन विहीर व दोन जलकुंभ निर्माण करणे, फिल्टर प्लँट उभारणे आणि ‘हर घर नल’ अंतर्गत गावात अंतर्गत पाइपलाइन टाकणे या प्रमुख कामांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी शासनाने १८ महिन्यांची मुदत निश्चित केली होती. मात्र, ही मुदत संपून वर्ष उलटले तरी काम अपूर्णच राहिल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
पाणी फिल्टर प्लँटसाठी करावी लागणार प्रतीक्षा Ãलाडसावंगी येथे पुढील ४५ ते ६० दिवसांत जलजीवनचे पाणी पोहोचावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पाणी फिल्टर प्लँटच्या पूर्णत्वासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. – दीपक कोळी , मुख्य कार्यकारी अभियंता