Headlines

आंध्र प्रदेशसह तेलंगणाची आवक घटल्याने मोसंबीच्या दरात प्रतिटन 10हजारांची वाढ:पाचोड येथील बाजार समितीच्या मार्केटमध्ये दररोज 150 ते 200 टन मोसंबीची आवक‎



तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील मोसंबीचा हंगाम संपुष्टात आल्याने देशभरातील प्रमुख बाजारपेठांत मराठवाड्याच्या मोसंबीला मागणी वाढू लागली आहे. परराज्यातील मोसंबीची आवक घटल्याचा फायदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होत असून, गुणवत्तेनुसार प्रतिटन २० ते २८ हजार रु

.

पैठण तालुक्यातील निम्म्या भागातील मोसंबीची तोडणी पूर्ण झाली असली, तरी जायकवाडी धरण परिसरातील ५०० हून अधिक हेक्टरवरील मोसंबीची तोडणी शिल्लक आहे. बाजारात वाढलेली मागणी पाहता आगामी काळात आणखी २ ते ५ हजार रुपयांपर्यंत भाववाढ होण्याची शक्यता असल्याचे पाचोड येथील मार्केटमधील व्यापारी इरफान शेख यांनी सांगितले. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले होते. त्यामुळे मोसंबीची गळ वाढल्याने कवडीमोल दराने बागांची विक्री करावी लागली होती. यंदाही सुरुवातीला १६ ते १८ रुपयांपर्यंत दर होता. मात्र, आता बाजारात आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील मोसंबीची आवक घटली आहे. त्यात मराठवाड्यातील मोसंबी गोड असल्याने मागणी वाढली आहे. परिणामी, सध्या २० ते २८ हजारांपर्यंत आणि वायदा असल्यास ३२ ते ३४ रुपयांचा समाधानकारक भाव मिळत आहे. मोसंबीची बाग उभी करण्यापासून ते फळांची तोडणी आणि बाजारपेठेत विक्री करण्यापर्यंत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. रासायनिक खते, कीटकनाशक औषधे, पाणी व्यवस्थापन, मजुरी, तोडणी आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने कमी बाजारभावाचा फटका उत्पादकांना बसत होता. निसर्गाच्या लहरीपणामुळे व प्रतिकूल हवामानामुळे बागांची निगा राखण्याचे मोठे आव्हान होते. सध्या बाजारपेठेत निर्माण झालेली ही तेजी आणि मागणी आगामी काळातही कायम राहणार का, याकडे उत्पादकांचे लक्ष लागले आहे. परराज्यातील आवक, महाराष्ट्रातील उपलब्ध माल, व्यापाऱ्यांची मागणी आणि वाहतूक खर्च या घटकांवर आगामी काळातील दर अवलंबून राहतील. दरातील ही सुधारणा अशीच टिकून राहिल्यास उत्पादकांना झालेला खर्च भरून काढण्यास मदत होणार आहे. Ãपैठण तालुक्यातील मोसंबीला आज देशभरातून मोठी मागणी आहे. मोसंबीचे एक मुख्य आणि मोठे केंद्र म्हणून पैठणचा नावलौकिक तयार झाला असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. तालुक्यात मोसंबीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अधिक आणि योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. – विलास भुमरे, आमदार, पैठण

गतवर्षी कवडीमोल दराने मोसंबीची विक्री

अधिक दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न

मोसंबीचे दर टिकून राहण्याकडे लक्ष



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *