Headlines

कराळे गुरुजींची राष्ट्रवादी श. प. तून सहा वर्षांसाठी हकालपट्टी:अपक्ष उमेदवारी कायम ठेवणे भोवले; शरद पवारांच्या नावाचा संभ्रम केल्याचा आरोप




नागपूर पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारीमुळे नितेश कराळे गुरुजींना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षातून सहा वर्षांसाठी काढून टाकले. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात त्यांनी अर्ज भरला होता. पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी याबद्दलचे पत्र काढले. पक्षाने दिलेल्या पत्रानुसार, अभिजीत वंजारी यांना पक्षाचा पाठिंबा असतानाही कराळे यांनी अपक्ष अर्ज भरला. उमेदवारी कायम ठेवल्यामुळे पक्षशिस्त आणि महाविकास आघाडीच्या निर्णयांचे उल्लंघन झाले. कराळे मतदारांमध्ये ‘शरदचंद्रजी पवार साहेब यांचा मला पाठिंबा आहे,’ असा संभ्रम निर्माण करत असल्याच्या तक्रारी पक्षाला मिळाल्या होत्या. याची दखल घेऊन, वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार कराळे यांना पक्षातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. कराळे गुरुजींची पदवीधर मतदारसंघातील ही दुसरी निवडणूक आहे. २०२० मध्येही त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, त्यावेळी त्यांना ६,८८९ मते मिळाली होती. ‘खदखद सर’ म्हणूनही ते ओळखले जातात. हेही वाचा… आंदोलने फोडणारी भाजपची नीच प्रवृत्ती उघडी पडली!:अंबादास दानवे म्हणाले- 500 कोटींचा दावा करणार्‍या भाजपच्या त्या महिलेला तत्काळ अटक करा “मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेली कथित 500 कोटींची ऑडिओ क्लिप ही अत्यंत गंभीर बाब आहे. भाजपच्या मीडिया सेलचे काम पाहणारी एक महिला उघडपणे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत 500 कोटी रुपये जरांगेंना पोहोचल्याचा दावा करत आहे. जर राज्यात कायद्याचे राज्य शिल्लक असेल, तर गृहखात्याने सर्वप्रथम या भाजपच्या मीडिया मॅनेजर महिलेवर FIR दाखल करून तिला थेट बेड्या ठोकल्या पाहिजेत. 500 कोटींचा स्रोत काय होता, ते शेतीचे उत्पादन होते, कंपनीचे होते की डोनेशनचे होते आणि ते श्रीकांत शिंदेंकडे कोणी दिले, याचा हिशोब पोलिसांनी जेलमध्ये बसवून घेतला पाहिजे,” अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *