Headlines

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी रविवारी मतदान:राज्यातील १.२३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार




महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी ता. 26 राज्यात मतदान होणार असून राज्यातील १.२३ लाख वैद्यकिय व्यवसायीक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेची निवडणुक प्रक्रिया सुरु असून यामध्ये ९ जागांसाठी ६० उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. राज्यातील वैद्यकिय व्यवसायांची शिखर परिषध असलेेल्या या परिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी वैद्यकिय व्यवासायीकांच्या विविध संघटना सरसावल्या असून या संघटनांकडून राजकिय पाठबळ देखील मिळण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यानुसार काही ठिकाणी राजकिय पक्षाच्या बैठका होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या परिषदेच्या ९ जागांसाठी साठ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. या परिषदेसाठी रविवारी ता. २५ सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार आहे. राज्यातील वैद्यकिय व्यावसायीक मतदान करणार असून यामध्ये राज्यातील सुमारे १.२३ लाख वैद्यकिय व्यवसायीक मतदान करणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी त्यासाठी मतदारांची ओळख पटविण्यासाठी त्यांचे कोणतेही एक मुळ दस्ताऐवज सोबत ठेवणे आवश्‍यक आहे. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकिय परिषदेने दिलेले नोंदणी प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेने दिलेले ओळखपत्र, भारतीय निवडणुक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र, विवाहित महिला मतदारांनी जर नाव बदलले असेल तर नांव बदलल्याचा पुरावा सोबत असणे आवश्‍यक आहे. राज्यात मतमोजणी पार पडल्यानंतर ता. २९ एप्रील रोजी सकाळी आठ वाजल्या पासून हाफकीन प्रशिक्षण संस्था परळ मुंबई येथे मतमोजणी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले. राज्यातील जिल्हानिहाय मतदार पुढील प्रमाणे अहिल्यानगर २९१६, अकोला २४७९, अमरावती २५६५, छत्रपती संभाजीनगर ४७७८, बीड ३२९३, भंडारा ८६६, बुलढाणा २६३५, चंद्रपूर १६४३, धुळे १२१३, गडचिरोली ३६३, गोंदिया ७५५, हिंगोली ८९५, जळगाव २५७०, जालना १०१०, कोल्हापूर २८६९, लातुर ३०९५, मुंबई १६६६८, मुंबई शहर ८५९०, नागपूर ८४५५, नांदेड ४०८५, नंदूरबार ५९१, नाशीक ४६५०, धाराशिव ११६८, पालघर ११३२, परभणी १८८०, पुणे १४२९५, रायगड २२५६, रत्नागिरी ५५६, सांगली २७०५, सिंधुदुर्ग २८४, सोलापूर ३५७५, ठाणे ११८५१, वर्धा १३१५, वाशीम ९९०, यवतमाळ जिल्हयातील २०४२ मतदारांचा समावेश आहे. एका मतदारास नऊ मतदान देता येणार या निवडणुक प्रक्रियेत एका मतदारास नऊ मतदान करता येणार आहे. ज्या उमेदवाराला मतदान करायचे त्यांच्या नावासमोर गुणाकाराचे चिन्हाची खूण करायची आहे. त्यासाठी काळी बाॅलपेन पुरविली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *