![]()
महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त बटगेरी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील महादेव कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांमधून अधिकारीपदी निवड झालेल्या समाज बांधवांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बटगेरी सामाजिक प्रतिष्ठ
.
जुळे सोलापुरातील जय जलाराम नगर येथील गणेश मंदिर येथे हा सोहळा झाला. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, दिव्य मराठीचे रिजनल हेड श्रीकांत कांबळे, जलसंधारण विभागाच्या अभियंता वैष्णवी कोळी (पुणे), नगरसेवक दीपक जमादार, गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव बेळे आदी मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे व श्री गणेश मूर्तीचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर बटगेरी यांनी केले. सूत्रसंचालन हनुमंत मोतीबने यांनी तर बापूसाहेब जमादार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नागनाथ दोरनाळे, लक्ष्मण कोळी, महादेव बेळे आदींनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जलसंधारण विभागाच्या अभियंता वैष्णवी कोळी यांनी स्पर्धा परीक्षा आणि सामाजिक प्रगती याचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासात सातत्य ठेवल्यास निश्चित यश मिळते. ज्या क्षेत्रामध्ये आपणास आवड आहे त्या क्षेत्रात उच्च शिक्षण घ्यावे असे सांगून आपल्या शैक्षणिक जीवनातील अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.
परीक्षेच्या यशातून सामाजिक प्रगती : कोळी
प्रतिष्ठानच्या कार्याचा मान्यवरांनी केला गौरव : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन म्हणून व सामाजिक बांधिलकी जपत बटगेरी प्रतिष्ठानने गेल्या अनेक वर्षांपासून गुणवंतांच्या पाठीवरती थाप मारण्यासाठी दिलेले योगदान वाखण्याजोगे अशा शब्दांत प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करून विद्यार्थ्यांना भविष्यात उज्वल यश संपादन करण्याच्या सदिच्छा नगरसेवक दीपक जमादार व संतोष पाटील यांनी दिल्या.