Headlines

Nilesh Chandra Muni Supports Raj Thackeray on Sahyadri Forest Protest


सह्याद्री वाचवण्यासाठी सकल जैन समाज बांधवांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले पाहिजेत. पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. भीमाशंकर परिसरात जी बेछूट वृक्षतोड सुरू आहे, ती अशीच सुरू राहिल्यास तिथले वन्यजीव कुठे जाणार? आज प्रत्येक

.

नीलेश चंद्र मुनी पुढे म्हणाले की, भीमाशंकरच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. विकासाच्या गोंडस नावाखाली संबंधित कंपनी मूक प्राण्यांची हत्या करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या खोऱ्यातील झाडे तोडली जात असून प्राण्यांचे बळी घेतले जात आहेत. मी ना अदानींचा समर्थक आहे, ना लोढा किंवा मेहतांचा समर्थक आहे. राज ठाकरे यांनी वृक्षतोडीविरोधात जी ठाम भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेच्या पाठीशी संपूर्ण जैन समाज खंबीरपणे उभा आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा

नीलेश चंद्र मुनी म्हणाले की, कबुतरांना मारणारे मंगलप्रभात लोढा आहेत. असे कितीतरी राजकीय नेते आहेत, जे स्वतःच्या राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी मूक प्राण्यांना ठार मारत आहेत. मात्र, राज ठाकरेंनी या वृक्षतोडीविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. गरज पडली तर मी स्वतः त्यांच्या आंदोलनात सहभागी होईन. आमचे आणि त्यांचे राजकीय विचार वेगळे असू शकतात, पण त्यांनी निसर्ग आणि पर्यावरणासाठी घेतलेल्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

विकासाच्या नावाखाली हजारो जीवांचा बळी

नीलेश चंद्र मुनी म्हणाले की, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि सह्याद्री आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. सह्याद्रीला वाचवण्यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला सारून एकत्र आले पाहिजे. झाडांची आणि वन्य प्राण्यांची हत्या करणारी कंपनी कुठलीही असो गुजरातची असो किंवा इतर कुठलीही, आम्ही तिला तीव्र विरोध करणारच. विकासाच्या नावाखाली हजारो जीवांचा बळी घेतला जात आहे. त्यामुळे सकल हिंदू समाज आणि सकल जैन समाजाने एकत्र येऊन या दडपशाहीचा विरोध करावा आणि महाराष्ट्र व सह्याद्री वाचवावा, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.

हे ही वृत्त वाचा मराठा आंदोलन संपवण्याचा कट अन् भीमाशंकरची वृक्षतोड एकाच पद्धतीची:सत्ताधाऱ्यांची नियतच खराब झाली आहे- मनोज जरांगे

मराठ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पडद्यामागे भाजपचे काही लोक किती भयंकर षडयंत्र रचत आहेत, हे सर्वच पक्षांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे. आम्ही याचा संपूर्ण छडा लावणार आहोत. माझ्यावर खूनी हल्ले करायचे, मला बदनाम करायचे, याचा छडा आम्ही लावणारच, असा संताप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपचा तपास अत्यंत खोलवर झाला पाहिजे. माझ्याकडे अजूनही बरीच महत्त्वाची माहिती येत आहे. या ऑडिओ क्लिपबद्दल हे सरकार नेमकी काय भूमिका घेते, ते आधी बघू द्या. यांनी जर ही क्लिप खोटी ठरवली, तर मग बघूच किती क्लिप खोट्या ठरवतात. मला नाही वाटत की ते ही क्लिप खोटी ठरवतील, आता पुढे काय होते ते बघूयात. माझ्याकडे अनेक गोष्टी आणि पुरावे आहेत, ते जर मी लोकांसमोर आणले तर हे लोक वेडे होतील. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.