![]()
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पक्ष संघटनेत मोठे आणि धोरणात्मक फेरबदल केले आहेत. मुंबईतील अल्पसंख्याक मतांची गणिते जुळवण्यासाठी युवा नेते झिशान सिद्दिकी यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ‘मुंबई अध्यक्षपदाची’ धुरा सोपवण्यात आली आहे. तर, दुसरीकडे विरोधकांना आक्रमकपणे सामोरे जाण्यासाठी पक्षाचे नेते उमेश पाटील यांची थेट ‘राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. झिशान सिद्दिकींकडे मुंबईची कमान: अल्पसंख्याक समीकरण साधण्याचा प्रयत्न वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रवेशाच्या काही दिवसांतच त्यांच्यावर मुंबई अध्यक्षपदासारखी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामागे राष्ट्रवादीची मोठी राजकीय रणनीती असल्याचे मानले जात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला बळकट करण्यासाठी आणि विशेषतः मुंबईतील अल्पसंख्याक तसेच तरुण मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी झिशान सिद्दिकी यांचा चेहरा वापरला जाणार आहे. वांद्रे आणि परिसरातील त्यांचा जनसंपर्क पाहता, त्यांच्या या नियुक्तीमुळे राष्ट्रवादीला मुंबईत नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा पक्षाला आहे. उमेश पाटील यांच्याकडे राष्ट्रीय प्रवक्तेपद दुसरीकडे, विरोधकांना रोखण्यासाठी आणि पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी राष्ट्रवादीने उमेश पाटील यांची राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. उमेश पाटील हे अभ्यासू आणि आक्रमक वक्ते म्हणून ओळखले जातात. माध्यमांमध्ये पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकीकडे संघटन पातळीवर तरुण आणि अल्पसंख्याक चेहरा पुढे करून मुंबईत पक्षाचा विस्तार करणे आणि दुसरीकडे वैचारिक आघाडीवर विरोधकांना रोखण्यासाठी आक्रमक प्रवक्त्याची नियुक्ती करणे, अशा दुहेरी रणनीतीवर राष्ट्रवादी काँग्रेस सध्या काम करत असल्याचे या दोन मोठ्या नियुक्त्यांवरून स्पष्ट झाले आहे. ——————– हेही वाचा.. मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर: पुणे शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीतून काँग्रेसचे जयंत आसंगावकर बाद
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या मतमोजणीचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आले नसले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. सविस्तर वाचा
Source link
आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी:झिशान सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा, उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्त