![]()
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे ११ लाख रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मदतीचा धनादेश देण्यात आला. पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांचे नुकसान, घटते उत्पन्न आणि शेतीवरील वाढता खर्च यामुळे शेतकरी कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचे योगदान देण्यात आले. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून, दुष्काळासारख्या संकटाच्या काळात त्यांना प्रत्यक्ष मदत मिळणे आवश्यक आहे. या भावनेतून मदतीची रक्कम देण्यात आल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार दुष्काळग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आमदार जगताप यांच्या माध्यमातून यापूर्वीही पिंपरी-चिंचवडमधील गरजू कुटुंबांना शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कारणांसाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. या वेळी चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या वतीने विजय जगताप, ॲड. सखाराम कोळसे-पाटील, निलेश पवार, प्रवीण जगताप आदी यावेळी उपस्थित होते. ———— हेही वाचा.. कर्जाचा हप्ता न भरल्याने एजंट्सकडून शेतकऱ्याचे अपहरण: 3 दिवसांनंतर फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मृतदेह आढळला; 5 जणांना अटक
नांदेड जिल्ह्यात ४० वर्षीय शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह एका खासगी वित्त कंपनीच्या कार्यालयात सापडला. कर्जाचा हप्ता न भरल्यामुळे वसुली एजंटनी चंद्रकांत यांचे अपहरण केल्याचा आरोप कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी केला आहे. तीन दिवसांनंतर त्यांचा मृतदेह सापडला. सविस्तर वाचा
Source link
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमदार जगताप यांचा मदतीचा हात:मुख्यमंत्री सहायता निधीत 11 लाखांचा धनादेश सुपूर्द