Headlines

सोयगाव तालुक्यामधील 26 हजार बालकांना विविध शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वितरण:तालुक्यातील 157 अंगणवाड्या आणि 124 शाळांमध्ये मोहीम



राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सोयगाव तालुक्यातील १५७ अंगणवाड्या आणि १२४ शाळांमध्ये मंगळवारी व्यापक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २८ हजार ६२९ अपेक्षित लाभार्थ्यांपैकी २६ हजार ९३७ बालकांना जंतनाशकाच्या गोळ्या देण्यात आल्या. मात्र, पालक मजुरीसाठी बाह

.

ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे समन्वयक विकास मेश्राम आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जरंडी, बनोटी आणि सावळदबारा या तीन आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. समुपदेशक अतुल मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहा अधिकारी, १९ पर्यवेक्षक आणि ३३६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आकडेवारीनुसार, जरंडी केंद्रांतर्गत ६४ अंगणवाड्या आणि ४४ शाळांमधील १२ हजार २२९ लाभार्थ्यांपैकी १२ हजार १४९ विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधोपचार देण्यात आले. बनोटी केंद्रांतर्गत ६५ अंगणवाड्या आणि ५४ शाळांमधील ११ हजार ७०० लाभार्थ्यांपैकी ११ हजार १३८ विद्यार्थ्यांना, तर सावळदबारा केंद्रांतर्गत ५८ अंगणवाड्या आणि २६ शाळांमधील ४ हजार ७०० लाभार्थ्यांपैकी ३ हजार ६५० विद्यार्थ्यांना औषधोपचाराचा लाभ मिळाला. सोयगाव तालुक्यातील १०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत औषधोपचार पोहोचवून एकही बालक सुटणार नाही, असा प्रयत्न राहील, असे डॉ. चावडा यांनी स्पष्ट केले.

शंभर टक्के लाभ देण्याचे तालुका प्रशासनाचे उद्दिष्ट बालकांमधील जंतसंसर्ग टाळणे, आरोग्य सुधारणे आणि स्वच्छताविषयक सवयींबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली. जे विद्यार्थी गोळ्यांपासून वंचित राहिले आहेत, त्यांच्यासाठी ३ नोव्हेंबरला पुन्हा विशेष फेरी घेण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *