Headlines

म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळली:नागपुरात दोन मजुरांचा मृत्यू, तीन जखमी




गणेशपेठ परिसरातील गीता ‎‎मंदिरासमोरील म्हाडा कॉलनी ‎‎(टेक्स्टाईल पार्क) येथे कमर्शियल ‎‎गाळ्यांच्या बांधकामादरम्यान‎शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी ‎‎१०:३० ते ११:०० वाजेच्या सुमारास‎टॉवर क्रेन कोसळून भीषण दुर्घटना ‎‎घडली. या अपघातात दोन मजुरांचा‎मृत्यू झाला असून, दोन जण जखमी‎झाले आहेत. बांधकामस्थळी ४०‎मीटर (अंदाजे १३० फूट) उंच क्रेनची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आणखी उंची वाढवण्याचे काम सुरू‎असताना अचानक तोल जाऊन ती‎वाकून खाली कोसळली. या दुर्घटनेत‎उंचावरून खाली फेकल्या गेल्याने‎क्रेनचालक विश्वनाथ कठाणे (वय‎४०, रा. गोंदिया) आणि मजूर मुकेश‎निशाद (वय २५, रा. जौनपूर, उत्तर‎प्रदेश) यांचा मृत्यू झाला. तर मंतुराम‎(वय २६) व महेश मिस्त्री (वय २८,‎दोघेही रा. बलरामपूर, छत्तीसगड) हे‎जखमी झाले असून, त्यांना‎उपचारासाठी खासगी रुग्णालयात‎दाखल करण्यात आले आहे. त्यांची‎प्रकृती स्थिर आहे.‎ अपघाताची माहिती मिळताच‎गणेशपेठ पोलीस आणि अग्निशमन‎दलाचे पथक घटनास्थळी दाखल‎झाले. क्रेनच्या वरच्या भागात‎अडकलेल्या मंतुराम या मजुराला‎सिव्हिल अग्निशमन केंद्रातील‎कर्मचारी गणेश राजुरकर व निलेश‎ठेठे यांनी स्ट्रेचरच्या साहाय्याने खाली‎उतरवून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात‎पोहोचवले. या प्रकल्पासाठी बी.‎जे. शिफ़्के कंपनीचे विवेक पगारे‎प्रोजेक्ट मॅनेजर तर रामजी प्रजापती‎क्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते.‎क्रेनची उंची वाढवताना ही दुर्घटना‎नेमकी कोणत्या तांत्रिक कारणामुळे‎घडली, याची चौकशी सुरू आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *