![]()
चारित्र्यावरील संशय, सततचा शारीरिक-मानसिक छळ आणि गरोदर असताना बळजबरीने घेतलेला घटस्फोट या सगळ्या त्रासाला कंटाळून एका १९ वर्षीय गर्भवती नवविवाहितेने घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. हा प्रकार २५ ऑक्टोबरच्या रात्री बीड बायपास परिसरातील आल
.
फिर्यादी वडील रमेश चव्हाण (४०) यांच्या तक्रारीनुसार, सोनूचा विवाह १२ जून २०२५ रोजी विनोदशी झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास केली. नातेवाइकांनी मध्यस्थी करून तिची समजूत घातली, मात्र सासरच्या छळाचा टप्पा वाढतच गेला. सोनू ६ महिन्यांची गर्भवती असताना ४ ऑक्टोबरला सासरच्या लोकांनी तिला जालन्याला काम असल्याचे सांगून नेले. तेथे नेऊन तिच्याकडून पती विनोदसोबतच्या घटस्फोटाचा बाँड तयार करून घेतला, तर सासू व मावसा यांनी तिचे लग्न धाकट्या दिराशी (विशाल) लावून देण्याचा घाट घातला होता. १४ ऑक्टोबर रोजी पतीने पुन्हा मारहाण केल्याने घाबरलेले वडील सोनू हिला आपल्या घरी (आलोकनगर) घेऊन आले होते. तर आत्महत्या नसून हत्या असल्याचा कुटुंबीयांचा आरोप सोनूच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कोजागरी पौर्णिमेच्या रात्री घडला थरार
कोजागरी पौर्णिमेच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास विनोद हा सोनूला भेटण्यासाठी तिच्या माहेरी आला. गप्पा मारल्यानंतर तो निघून गेला. तासाभरात परत आला. त्यानंतर सोनू, तिचा पती आणि लहान बहीण हे तिघे घराच्या गच्चीवर बसले होते. रात्री ४ वाजेच्या सुमारास सोनू आणि पती विनोद यांच्यात तीव्र वाद सुरू झाला. वाद वाढल्याने बहीण वडिलांना उठवण्यासाठी खाली आली. त्याच वेळी गच्चीवरून जोरदार काहीतरी पडल्याचा आवाज आला.