Headlines

नागपूरच्या वर्धमाननगरातील स्टीलच्या गोदामाला भीषण आग:अग्निशमन दलाच्या 7-8 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट




नागपूर शहरातील वर्धमाननगर परिसरातील स्मॉल इंडस्ट्री एरियामध्ये असलेल्या ‘आर टी ग्लोबल पार्क प्रभू स्टील’ या कंपनीच्या गोदामाला आज भीषण आग लागल्याची घटना घडली. या ठिकाणी लॉजिस्टिकचे काम चालत असून छोटे-छोटे गोडाऊन्स आहेत. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट उठले असून आजूबाजूच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्धमाननगर येथील प्रभू स्टील चौकात ही इंडस्ट्री आहे. आज सुटीचा दिवस असल्याने गोदाम बंद होते आणि आतमध्ये कोणीही कामगार उपस्थित नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी पांगवली गर्दी घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. आगीची तीव्रता पाहता त्यानंतर 5 ते 6 आणखी गाड्या मागवण्यात आल्या. सध्या अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्यांच्या साहाय्याने जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. हे ही वृत्त वाचा पाबे घाटात पर्यटकांची कार दीडशे फूट खोल दरीत कोसळली:निसरड्या रस्त्यामुळे बंद पडलेली कार दरीत, तिघे जखमी
तोरणा किल्ला पाहण्यासाठी हडपसर येथून निघालेल्या पर्यटकांच्या कारचा पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाटात भीषण अपघात झाला. घाट चढत असताना अचानक बंद पडलेली कार पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर घसरत थेट सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने मागून येणाऱ्या पर्यटकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि मदतीमुळे या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मोनीस अरविंद चव्हाडिया, रितिका सिंग आणि उमेश अशी कारमधील प्रवाशांची नावे आहेत. हे तिघे आज पहाटे हडपसर येथून तोरणा किल्ला पाहण्यासाठी कारने निघाले होते. सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास ते पाबे घाट चढत असताना त्यांची कार अचानक बंद पडली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *