Headlines

बाजारपेठांमध्ये आकाश कंदिलांचा झगमगाट:बार्शीत विविध आकाराचे आकाश कंदिल, एलईडी लायटिंगला मागणी




येत्या तीन-चार दिवसांत दिवाळी सणाला सुरुवात होईल. त्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरातील बाजारपेठा विविध आकर्षक वस्तूंनी सजल्या आहेत. दिवाळीच्या सजावटीत विशेष महत्त्व असलेल्या आकाश कंदिलांच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. शहरातील बाजारपेठेत यंदा पारंपरिक आकाश कंदिलांसोबतच आकर्षक रंगसंगती, डिझाईन आणि नवनवीन कलाकुसर असलेल्या आकाश कंदिलांचे विविध प्रकार ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. नवीन डिझाइन्सला अधिक मागणी आहे. लहान मुलांसाठी कार्टून आणि विविध आकर्षक आकारांतील कंदील, तर घराच्या प्रवेशद्वारासाठी मोठ्या आकाराचे आणि आकर्षक सजावटीचे कंदील उपलब्ध आहेत. कमी जागेत लावता येणारे छोटे कंदील तसेच मोठ्या इमारती आणि बंगल्यांसाठी विशेष आकर्षक कंदिलांचे पर्यायही बाजारात पाहायला मिळत आहेत. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कंदिलांच्या खरेदीसाठी ग्राहकांकडून विविध प्रकारांची चौकशी केली जात आहे. कमी किमतीतील साध्या कंदिलांपासून ते आकर्षक सजावटीच्या महागड्या कंदिलांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असल्याने प्रत्येकाच्या बजेटनुसार खरेदी करता येणार आहे. बार्शी | तालुक्यातील कुसळंब येथे सामाईक शेतजमिनीच्या बांधावर पाण्याचा बोअरवेल घेण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही गटाच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. कुसळंब येथील सामाईक शेती गट क्रमांक ३८४ च्या बांधावर २५ ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना घडली. सदर शेतात पाण्याचा बोअरवेल घेण्यासाठी रस्तुम ठोंगे यांनी बोअरवेलची गाडी आणली त्यावेळी संजय ठोंगे यांनी सदर गट क्रमांकाची प्रथम अधिकृत मोजणी करून घेऊ आणि त्यानंतरच शेतात बोअर मार अशी भूमिका घेतली. यावरून दोघांत वाद होऊन हाणामारी झाली. याप्रकरणी संजय ठोंगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रस्तुम ठोंगे, अनिकेत ठोंगे, बाळासाहेब ठोंगे (तिघे रा. कुसळंब) आणि तात्यासाहेब गात (रा. गाताचीवाडी) यांनी संगनमत करून लोखंडी फावडे व लोखंडी रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ व दमदाटी केली. दरम्यान या मारहाणीत जखमी रस्तुम ठोंगे यांच्यावर बार्शीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून संजय ठोंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पारंपरिक कापडी अन् बांबूच्या काड्यांपासून बनवलेला, रंगीबेरंगी कागदी कंदील, मकर आकाराचे कंदील, कमळाच्या आकारातील कंदील, स्टार आकार, झिरमिळ्या असलेले फॅन्सी कंदील तसेच एलईडी लाइटिंग असलेले आकाशकंदील बाजारात उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे यंदा थ्रीडी डिझाईन, आकर्षक पेपर कटिंग, राजवाड्याच्या प्रतिकृतीसारखे, पारंपरिक भारतीय कलाकुसर असलेले, एलईडी आकाशकंदील यांना पसंतीस उतरत आहेत. ^यावर्षी साधारण ९० रुपये ते ११०० रुपयांपर्यंत भारतीय बनावटीचे ज्यूट कपड्याचे आणि फोटो फ्रेमचे नवनवीन डिझाइन लहान मोठ्या आकारात उपलब्ध आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने विक्रीवर परिणाम होईल असे वाटत आहे . ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्यामुळे यंदाच्या विक्रीत चांगली वाढ अपेक्षित आहे. सर्वाधिक मागणी पारंपरिक आकाशी दिव्यांना आहे. अभिजित गंगावणे, विक्रेते, बार्शी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *