Headlines

केळीला प्रतिकिलो 2 रुपये दर‎चार एकरावर फिरवला रोटावेटर:शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्याची 4 ते 6 रुपये ठोक भावाने खरेदी




हिम्मत जाधव | माढा दुष्काळाच्या झळा, लोडशेडिंग आणि पाणीटंचाईच्या कात्रीत सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. काढणीस आलेल्या केळीच्या बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच काहीना पाण्याअभावी बागा सोडून देण्याची वेळ आली आहे. अशा संकटग्रस्त परिस्थितीचा फायदा घेत विक्रिस आलेल्या केळीस व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दर दिला जात असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. नैसर्गिक संकटासोबतच व्यापाऱ्यांच्या दरकोंडीने हतबल झालेल्या केळी उत्पादकांना शासनाने विशेष आर्थिक मदत व सहकार्य करावे, अशी मागणी अखिल भारतीय बनाना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण चव्हाण यांनी केली. ऊस शेतीला पर्याय म्हणून शेतकरी केळी पिकांकडे वळले आहेत. २०२२ च्या आकडेवारी नूसार एकंदर केळी उत्पादनात भारत जागतिक स्तरावर आघाडीचा देश राहिला असून देशाचे केळी उत्पादनातील योगदान २५ टक्के आहे. महाराष्ट्रात एकूण उत्पादनाच्या जवळपास ७० टक्के केळीचे उत्पादन घेतले जाते. मागील दोन वर्षात महाराष्ट्रात २.५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर केळी लागवड केली होती. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे केळीच्या लागवडीत घट झाली. यंदा १.७५ लाख हेक्टर क्षेत्र केळीने व्यापले होते. यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने केवळ ९० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आहे. गतवर्षी लागवड अधिक असूनही ऑक्टोबर महिन्यामध्ये केळीस २५ ते ३० रुपचेदर मिळाला. यंदा मात्र उत्पादन कमी असूनही, १० ते १२ रुपये दर दिला जात आहे. दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई त्यात लोडशेडिंगची भर पडल्याने शेतकऱ्यांवर बागा सोडून देण्याची वेळ आली. खोडवा पीक यशस्वी करण्य ासाठी २ लाख रुपयांचा खर्च केला होता.ग तवर्षी याच बागेतून पहिल्या पिकाला २० ते २५ रुपये प्रतिकिलो दर प्राप्त झाला होता . परंतू यंदा अवघा दोन रुपये इतका कमी दर प्राप्त होऊ लागल्याने अपेक्षित असे उत्पन्न मिळणार नसल्याने सदर केळी विकण्यापेक्षा सदर बागेवर रोटावेटर फिरवल्यास त्याचे सेंद्रिय खत होईल आणि भविष्यात पुढचे पीक तरी चांगले येईल, या विचाराने मी केळीच्या घडांसह संपूर्ण बागेवर रोटोवेटर फिरवत ते माती खाली गाढले. दर नसल्याने शेतकऱ्यावर ही वेळ आली दुष्काळात उपलब्ध पाण्याचे नियोजन करत लाखो रुपये खर्च करून आणलेल्या शेतीमालास अपेक्षित दर मिळत नसल्याने पिके मातीत गाडावे लागत आहेत. शेतकरी आर्थिकदृष्ट्या अनेक वर्षे मागे जाईल. तोटा सहन करावा लागतोय. -मोहोन ढेकळे, पापरी प्रतिनिधी | पापरी आखातातील निर्यात बंदीमुळे दर पडल्यामुळे केळीचा दर प्रति िलोला दोन रुपयांवर आला. त्यामुळे पापरी (ता. मोहोळ) येथील शेतकऱ ्याने उतरणीस आलेल्या केळी घडासह चार एकर बागेवर रोटावेटर फिरवला. फळबागेवर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोहन ढेकळे यांनी केळी पीक गाढले. या संदर्भात शेतकरी मोहन ढेकळे म्हणाले, चार एकर क्षेत्रात केळीची बाग होती, तिचे हे दुसरे (खो वा) पीक होते. पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी स्त्रोतांची पाणी ातळी खाला लेली असता नाही उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करत सदर बागेची उत्तम जोपासना केली होती. चांगल्या प्रतीचे घडही निर्मिती झालेली केळीचे घड उतरवि ण्यास योग्य झाल्याने गत आठवड ्यात व्यापा ्यांना बोलावून बाग दाखवली. व्यापाऱ््यांनी इराक इराण देशातील युद्ध, िनर्यात बंदीचे कारण देत सदर केळीला २५ किलोच्या कॅरेटला ५० रुपये, ्हणजेच प्रतिकिलो अवघे दोन रुपये दर देऊ केला.त ्यातही केळीचे घड बागेतून काढून बाहेर आणून देण्याची अट घातली. घड बागेतून उतरणी करून देणे परवडणारे नाही ते खर्चिक आहे. केवळ १७ हजार रुपयांची केळी विकली : चार एकरांतील केळीपैकी केवळ १७ हजार रुपयांची केळी विकली. केळीचे घड वजनामुळे जमिनीवर पडू नयेत, यासाठी १० हजार रुपये खर्चून प्लास्टिकच्या पट्ट्याही बांधल्या होत्या. घड उतरवण्यापूर्वी त्यास ८० हजार रुपयांची खतांची अतिरिक्त मात्राही दिली होती, असे ढेकळे यांनी सांगीतले. निर्यात बंदीमुळे केळीचे दर पडले होते इराक इराण देशातील युद्धामुळे तसेच निर्यात बंदीमुळे केळीचे दर पडले आहेत,लागणीच्या केळी मालाला ६ ते ७ व खोडवा केळी मालाला ३ ते ४ रुपये प्रतिकिलो दर मिळतोय. आता हळूहळू दर वाढू लागले आहेत. -गोरख हैदळे, केळी खरेदी व्यापारी पापरी येथील मोहन ढेकळे यांनी शेतातील केळी बागेत रोटावेटर फिरवीत केळी धुडासह घडही जमिनीत गाडले केळी उत्पादकांना विशेष पॅकेज द्या दुष्काळी परिस्थिती आणि व्यापाऱ्यांच्या दर अडवणुकीमुळे केळी उत्पादक आर्थिक संकटात सापडल्याने केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना विशेष पॅकेज द्यावे.तसेच जळगांव ,अमरावती बाजारपेठे नूसार व्यापाऱ्यांनी दर द्यावा .हा दर न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. – किरण चव्हाण ,अध्यक्ष अखिल भारतीय बनाना महासंघ. यंदा प्रतिकिलोला साडेसहा रुपये दर मी गेल्या पाच-सहा वर्षांपासून केळीची लागवड करत आहे. मला नेहमी २५ ते ३० रुपये दर मिळतो. यंदा लागवड कमी असूनही व्यापाऱ्यांनी ६.५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे दर दिला. पाणीटंचाईमुळे मला या दरात बाग द्यावी लागली. यंदा उत्पादन खर्चही न निघल्याने शासनाने सहकार्य करावे. – दर्लिंग पुजारी, चळे, केळी उत्पादक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *