Headlines

शेती, शिक्षणाच्या समस्येवर काम‎करणे आवश्यक- डॉ. सपकाळ:मराठा मंडळाची सर्वसाधारण सभा अन् दसरा संमेलन उत्साहात



जिल्हा मराठा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे व दसरा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आज शेती अडचणीत आली आहे. शिक्षण महागडे झाले आहे. तरुणांना रोजगार नाही. मुला-मुलींची लग्ने जुळत नाहीत. या गंभीर समस्या समाजासमोर आहेत. मंडळाने यावर काम करण्याची गर

.

मंडळाच्या १०४ व्या सर्वसाधारण सभेची सुरुवात राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करून झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील होते. व्यासपीठावर ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार, रामेश्वर फुंडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, माजी आमदार वसंतराव खोटरे, उपाध्यक्ष दिवाकर पाटील, कोषाध्यक्ष डॉ. विनोद बोर्डे, सचिव प्रा. डॉ. विवेक हिवरे, सहसचिव श्रीकांत पागृत, अनिल राऊत, पंकज देशमुख, संजय सरप, डॉ. निखिल बोर्डे, डॉ. विनीत हिंगणकर, निलेश पाचडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध ठराव पारित करण्यात आले. साऊथ आफ्रिकेहून आलेले मकरंद सवाई तसेच पीएचडी प्राप्त डॉ. गजानन चोपडे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विवेक हिवरे यांनी केले. अल्पोपहाराने सभेची सांगता झाली. यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधायक कार्य सुरूच राहील : समाजातील ज्येष्ठांच्या प्रेरणेने मंडळाची वाटचाल सुरू आहे. प्रकाश पाटील म्हणाले की, यापुढेही समाजाला आवश्यक बाबींवर विचारविमर्श करून विधायक कार्यक्रम राबवले जातील. दुष्काळाचे सावट लक्षात घेता कमीत कमी खर्चात लग्नकार्य करण्याचे आवाहन अध्यक्षीय भाषणात केले. कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर यांनी भेट देऊन दसरा संमेलनास शुभेच्छा दिल्या.

पूर्वजांनी एकत्र येऊन समाजाच्या भल्यासाठी मंडळाची स्थापना केली. आजही कार्यकर्त्यांनी आपली कामे सांभाळून मंडळाच्या विकासासाठी झोकून देऊन काम करावे, असे महादेवराव भुईभार म्हणाले. रामेश्वर फुंडकर म्हणाले की, समाजाच्या आजच्या समस्यांवर मंथन करण्याची गरज आहे. विवाहाची समस्या, पालकांच्या समस्या यांची तरुण पिढीला जाणीव करून द्या. ३० ते ४० वयोगटातील तरुणांना मंडळाच्या कामात जोडा. तरुणाईला दिशा दिली तर मंडळाचे काम पुढे जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *