![]()
जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्पातील उपेक्षितांच्या न्यायहक्कांसाठी आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेने केला आहे. प्रकल्पातील कंपनीच्या अधिपत्याखाली सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. मात्र त्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेने केला आहे. श्रमिकांच्या मूलभूत हक्कांसाठी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्धार सेनेकडून करण्यात आला आहे. शासनाच्या प्रचलित वेतनानुसार कंत्राटी कामगारांना निश्चित केलेले वेतन, सुरक्षा रक्षक मंडळाच्या धोरणानुसार सुरक्षा रक्षकांना देय वेतन अनुज्ञेय असताना संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कार्यरत श्रमिकांचे, सुरक्षा रक्षकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले जात असल्याचा आरोप संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष जी. एम. भालेराव यांनी केला आहे. सुरक्षा रक्षकांवर १२ तास ड्युटी लादणे, अत्यल्प स्वरूपात मोबदला देणे, साप्ताहिक सुट्टी न देणे, सुट्यांचा पगार न देणे, अल्प मनुष्यबळाचा वापर करून अतिरिक्त कामाचा भार टाकणे, ओळखपत्राचा अभाव, प्रमाणित सुरक्षितता साधनांचा अभाव, ठराविक कालावधीत वेतन न देणे, वेतनस्लिप न देणे, इत्यादी कायदेशीर सोयी-सुविधा मिळत नसल्याचा आरोप जी. एम. भालेराव यांनी केला आहे.
Source link
सौर उर्जा प्रकल्पातील उपेक्षितांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करणार:महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती राेजंदारी मजदूर सेनेचा इशारा