Headlines

सिल्लोडमध्ये धम्मध्वजारोहण, भव्य धम्मरॅलीने वर्षावास समारोप सोहळा:कठीण चिवरदान सोहळ्यास शहरातील भाविकांची मोठी उपस्थिती



शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील प्रसिद्ध नागसेन बुद्धविहार येथे वर्षावास समारोप व कठीण चिवरदान २०२६ सोहळा उत्साहात पार पडला. या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमास आमदार अब्दुल सत्तार आणि भिक्खू रत्नदीप महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती

.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासह सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे अत्याधुनिक सामाजिक सभागृह उभारणे तसेच परिसरात नव्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचे पूर्णाकृती भव्य पुतळे उभारण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. या संदर्भातील सर्व आवश्यक कामांचे तातडीने परिपूर्ण प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातील सर्वोत्तम, प्रगल्भ आणि सर्वसमावेशक अशी राज्यघटना दिली. त्यांनी निर्माण केलेल्या घटनेमुळेच आज समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात येण्याची आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे, असेही ते म्हणाले.

सिल्लोड शहरामधील नागसेन बुद्धविहार येथे सामूहिक पूजापाठ, परित्राणपाठ वर्षावास समारोप कार्यक्रमाची सुरुवात सकाळी धम्मध्वजाच्या पूजनाने व ध्वजारोहणाने झाली. यानंतर शहरातून भव्य धम्मरॅली काढण्यात आली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने उपासक-उपासिका सहभागी होते. बुद्धविहारात सामूहिक पूजापाठ व परित्राणपाठ पार पडला. यानंतर भिक्खू संघाचे भोजनदान आणि भिक्खू रत्नदीप महाथेरो यांच्या उपस्थितीत धम्मबांधवांना उद्बोधक धम्मदेसना पार पडली. संपूर्ण परिसर बुद्ध आणि धम्माच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. सोहळ्यास नगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, माजी नगराध्यक्षा राजश्री निकम, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, नगरसेवक जुम्मा खा. पठाण, सुधाकर गायकवाड, जितू आरके, अमित आरके, संतोष शिनगारे, प्रकाश हिवराळे, कडूबा दुबे, प्रभाकर पारधे, जगदीश बेदवे, दयानंद आरके, संदीप दांडगे, शिवा टोम्पे, जगन्नाथ कुदळ, प्रा. विजय वाकेकर, शेषराव आरके, जी. एस. आरके आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *