.

सोलापूर जिल्हा वाहतूक शाखेने केलेल्या काटेकोर नियोजन आणि धडक कारवाईमुळे यंदा अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे तीन महिने ऊस वाहतूक आणि सण-उत्सवामुळे वर्दळ वाढते. जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने विविध पथकांच्या माध्यमातून जनजागृती, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर जिल्हा वाहतूक शाखेने विविध ठिकाणी विशेष पथके तैनात केली असून, अपघातमुक्त दिवाळी आणि नवीन वर्षासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या वेळी दीपक बरडे पोलिस निरीक्षक, पीएसआय बी. टी. राठोड, पीएसआय डी. एस. काळे, धर्माधिकारी, पोतदार आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटवर वाहतूक शाखेचे लक्ष पूर्वी मोहोळ, टेंभूर्णी, करमाळा, कुर्डुवाडी, पंढरपूर आणि सोलापूर तालुका या पट्ट्यात अपघाताचे प्रमाण सर्वाधिक होते. या ठिकाणांना ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करून तेथे विशेष *शीघ्र सुरक्षा पथके* नेमण्यात आली आहेत. या पथकांनी २४ तास गस्त घालून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केल्याने अपघात कमी झाले आहेत.
ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवून घेतले ऊस वाहतूक ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावणे, मोठ्या आवाजावर बंदी घालून शिस्त लावण्यात आम्हाला यश आले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या नवरात्रोत्सव निमित्त तुळजापूर येथे एकही अपघात घडला नाही. अक्कलकोट श्री स्वामी महराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी योग्य नियोजन केले आहे. जिल्हाभरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. – दीपक बरडे, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, सोलापूर