Headlines

शरद पवारांची प्रकृती स्थिर, वेदना थांबल्या:रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांची माहिती; सर्व काही सुरळीत राहिल्यास उद्या डिस्चार्जची शक्यता




राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना जाणवणाऱ्या वेदना थांबल्या असून, उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत आहेत. प्रकृतीत अशीच सुधारणा कायम राहिल्यास बुधवारी (दि. 4) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता आहे. रुबी हॉल क्लिनिक प्रशासनाने मंगळवारी अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ के. ग्रँट यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती स्पष्ट केली. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून, उपचारांचा नियमित आढावा घेतला जात आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना जाणवणाऱ्या वेदना थांबल्या आहेत. उपचारांना ते उत्तम प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. शरद पवार यांची प्रकृती सुधारत असल्याने त्यांच्या रुग्णालयातील मुक्कामाबाबत सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार प्रकृतीत अपेक्षित सुधारणा कायम राहिल्यास बुधवारी त्यांना घरी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, डिस्चार्जबाबतचा अंतिम निर्णय त्यांच्या प्रकृतीचा पुढील वैद्यकीय आढावा घेतल्यानंतरच घेतला जाणार आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळासह त्यांच्या समर्थकांमध्येही चिंता व्यक्त केली जात होती. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी रुग्णालय परिसरात गर्दी करू नये असे देखील सांगण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *