Headlines

आपल्या सगळ्यांच्या आत असते एक झाड:छत्रपती संभाजीनगरात कवींचा 'कविता झाडासाठी' उपक्रम; भीमाशंकर येथील वृक्षतोडीचा निषेध




भीमाशंकर परिसरात होत असलेल्या झाडांच्या कत्तलीविरोधात छत्रपती संभाजीनगरमधील निसर्गप्रेमी साहित्यिकांनी काव्यात्मक सुरात आपला विरोध नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर ‘एक कविता झाडासाठी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी दासू वैद्य होते. कार्यक्रमात २५ कवींनी झाड या विषयावर आपल्या स्वरचित कविता सादर करत पर्यावरणाचे महत्त्व आपल्या प्रज्ञा आणि प्रतिभेतून मांडले. तसेच यावेळी पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले. आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य राम चव्हाण आणि प्रा. ह. नि. सोनकांबळे यांनी पर्यावरणाचे रक्षण किती गरजेचे आहे हे पटवून दिले; तसेच वृक्ष संवर्धनाच्या या चळवळीत साहित्यिक ज्या पद्धतीने पुढे आले आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. कवींनी एकापेक्षा एक सरस रचना सादर केल्या. यामध्ये संगीता चव्हाण, ॲड. कैलास कोळपकर, मनोहर सखाराम महाडिक (प्रयास फाउंडेशन), रमेश ठोंबरे, डॉ. अमरजीत बाहेती, अंजली दीक्षित, सुनीता कपाळे, तन्वी न्यायाधीश, ऋषभ कुलकर्णी, कविता जाधव, सुनीलकुमार सोळंके, आदित्य इंगळे, माधव कुलकर्णी, डॉ. भारतभूषण, बलराज संघई, डॉ. सुशीलकुमार सातपुते, दीपक नागरे, मोहन प्रधान, आर. पी. शिखरे, शितल रामकृष्ण भोईटे, नितीन तेलगावकर, भारत हाजगुडे आणि आशा डांगे यांनी केलेल्या काव्यवाचनाला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी महात्मा गांधी स्मारक निधी केंद्राचे कार्याध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गोर्डे, विजय राऊत, विवेक जैस्वाल, डॉ. मानसी बाहेती, डॉ. संतोष तांदळे यांच्यासह अनेक निसर्गप्रेमी व वृक्षसंवर्धक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बोधिमित्र राजेश भोसले यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर संपूर्ण सूत्रांची धुरा डॉ. समाधान इंगळे यांनी सांभाळली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आशा डांगे, डॉ. सविता लोंढे, पद्माकर काळे, कबीर इंगळे व नीलेश हरणवाल यांनी विशेष प्रयत्न केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *