![]()
अहिल्यानगर यंदाच्या दिवाळीत नगरकरांनी पर्यावरणपूरक सजावटीला पसंती देत ‘झिरो-वेस्ट’ सणाचा संकल्प केला आहे. रासायनिक सजावट, प्लॅस्टिक आणि थर्माकोलला फाटा देत शाडूच्या मूर्ती, मातीच्या पणत्या आणि दिव्यांची खरेदी वाढली आहे. सावेडी, तपोवन रोड परिसरात पारंपरिक वस्तूंना मागणी आहे. महिला बचत गटांनी बांबू, जुन्या साड्यांचे काठ व कापडापासून आकाशकंदील तयार केले आहेत. रांगोळीसाठी फुलांच्या पाकळ्या व नैसर्गिक रंग वापरण्याचा कलही वाढत आहे. पर्यावरणपूरक दृष्टिक्षेप मातीच्या पणत्यांची बहार: मागील वर्षाच्या तुलनेत यंदामातीच्या दिव्यांच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती कुंभार गल्लीतील विक्रेत्यांनी दिली आहे. हस्तनिर्मित आकाशकंदील: महिला बचत गटांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक कंदिलांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. प्लास्टिकमुक्त सोसायट्या: शहरातील ४० हून अधिक सोसायट्या व आस्थापनांनी यंदा प्लॅस्टिकमुक्त सजावट करण्याचा आदर्श संकल्प केला आहे. बाजारात पर्यावरणपूरक आकाशकंदिलांना नगरकरांची पसंती मिळत आहे. प्रदूषणमुक्त दिवाळीचा निर्धार ^यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्याचा निर्धार आहे. चायनीज साहित्याऐवजी स्थानिक हातांना काम मिळावे म्हणून मातीचे दिवे आणले. सजावटीसाठी कागद व कापडापासून बनवलेले आकाशकंदील आहेत. सण आनंदाचा असावाच, पण त्यामुळे निसर्गाचे नुकसान होऊ नये, ही जाणीव आता नगरकरांच्या मनात रुजताना दिसतेय, याचा खूप आनंद वाटतो. – डॉ. अमोल बागुल, आदर्श शिक्षक. दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देण्याच्या पद्धतीतही यंदा बदल दिसत आहे. प्लास्टिक वेष्टणांऐवजी ज्यूटच्या बॅगा, मातीची भांडी किंवा घराची शोभा वाढवणारी रोपे देण्याचा नवा ट्रेण्ड रुजत आहे. रेडीमेडऐवजी घरगुती साहित्यापासून बनवलेल्या फराळाच्या खरेदीला नगरकर प्राधान्य देत आहेत.
Source link
"चायनीज''ला फाटा देत पर्यावरणपूरक सेलिब्रेशन:मातीच्या पणत्या, कागदाचे आकाशकंदील, नैसर्गिंक रंगाच्या रांगोळ्यांना मागणी