![]()
टोरंट कंपनीचा आयपीएलशी संबंध आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या मुलाशीही याचा संबंध आहे. टोरंट प्रकल्पाला विरोध करणारे राजकीय पक्षाचे नेत्याच्या पक्षाला कंपनीने राजकीय डोनेशन दिले आहे,राजकीय पक्ष टोरंट ग्रुपसोबत उभे राहणार की सह्याद्री बचावासाठी लढणाऱ्या लोकांसोबत उभे राहणार? याचा खुलासा या पक्षांनी करावा, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, टोरंट पॉवर यांनी ईलेक्ट्रोल बॉण्डविकत घेतले असून त्यांनी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह शिवसेनेला फंड दिला आहे. यासह आम आदमी पक्षाला सुद्धा फंड दिला आहे. तर त्यांचा एक प्रकल्प आसाममध्ये सुद्धा आहे त्यासाठी त्यांनी भाजप आणि तिथल्या स्थानिक पक्षांना फंड दिला आहे. कंपनीकडून पैसे घेणारे लोकं स्थानिकांना जाऊन भेटली खरी पण ते कंपनीची बाजू घेणार की स्थानिकांचा असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांचा काय म्हणाले? टोरंट पॉवरने ईलेक्ट्रोल बॉण्ड घेऊन खालील राजकीय पक्षांना पक्ष निधी दिलाय.
• भाजप – 76 कोटी रुपये
• भारतीय काँग्रेस पार्टी – 17 कोटी रुपये
• राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – 3.5 कोटी रुपये
• शिवसेना – 3 कोटी रुपये
• आम आदमी पार्टी – 7 कोटी रुपये टोरंट पॉवरचा एक प्रोजेक्ट टोरंटो फार्मसिटीक्युल डोनेशन नावाने आसामच्या सिलिगुडीमध्ये आहे. या कंपनीने सुद्धा ईलेक्ट्रोल बॉण्ड विकत घेऊन भाजपला 61 कोटी रुपये दिले. • सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा – 7 कोटी रुपये
• काँग्रेस 5 कोटी रुपये
• समाजवादी पक्ष 3 कोटी रुपये
• आम आदमी पक्ष 1 कोटी रुपये
• सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट 50 लाख रुपये.
आतापर्यंत भाजप – 137 कोटी रुपये आणि काँग्रेस पक्षाला 22 कोटी रुपये मिळाले आहेत. हे सर्व डोनेशन 2022-24 साली देण्यात आले आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. शहांच्या मुलाचा अन् आयपीएलचा संबंध प्रकाश आंबेडकर म्हणाले की, टोरंट कंपनीचा थेट संबंध आयपीएल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुलाशी आहे. ज्या पक्षांनी टोरंट पॉवरकडून कोट्यवधी रुपयांचा निधी घेतला, त्याच पक्षांचे नेते कर्जतमधील शेतकऱ्यांना भेटून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा आव आणत आहेत. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्यासह लाभार्थी पक्षाच्या नेत्यांनी आता स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. राजकीय देणगी घेतल्यानंतर हे पक्ष टोरंट ग्रुपच्या पाठीशी उभे राहणार की सह्याद्रीच्या रक्षणकर्त्यांच्या बाजूने? असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे. हे ही वृत्त वाचा.. मनसेकडून यंदाचा दीपोत्सव रद्द, साधेपणाने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन: राज ठाकरे म्हणाले- फटाके, रोषणाईला आवर घाला
मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने साजरा होणारा ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ यंदा रद्द करण्यात आला आहे. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेतल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच, राज्यातील नागरिकांनीही यंदा फटाके आणि रोषणाईला आवर घालून साधेपणाने दिवाळी साजरी करावी, असे भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. सविस्तर वाचा
Source link
टोरंट पॉवरकडून फंड घेणारे राजकीय पक्ष टोरंटसोबत की सह्याद्री वाचवणाऱ्यांसोबत?:प्रकाश आंबेडकरांचा रोखठोक सवाल, म्हणाले- भाजपला 137 तर काँग्रेसला 22 कोटी मिळाले