Headlines

एमपीडीए कारवाईनंतर फरार आरोपी निखील कांबळेला अटक:मैत्रिणीला भेटायला आल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पकडले




एमपीडीए कारवाईनंतर फरार झालेल्या निखील मधुकर कांबळे (वय 22) याला लक्ष्मीनगर पोलिसांनी येरवडा परिसरातून अटक केली. तो लक्ष्मीनगर, येरवडा येथे राहतो.झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कांबळेवर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सप्टेंबरमध्ये दिले होते. त्याला वर्षभरासाठी कारागृहात ठेवण्यात येणार होते. मात्र, कारवाईनंतर तो पोलिसांसमोर हजर झाला नाही आणि फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. कांबळेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो लक्ष्मीनगर भागात मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या तपास पथकातील पोलिस कर्मचारी राहुल परदेशी, अक्षय शिंदे आणि किरण भागीत यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. पोलिस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत आणि सहायक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर कदम आणि दिलीपकुमार वेडे, सहायक निरीक्षक निखील पवार, दत्तात्रय लिगाडे, मयूर सूर्यवंशी, गणेश लोखंडे, श्रीनाथ कांबळे आणि अमोल वायाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला. रिक्षातून मोबाइल हिसकावला; जिवे मारण्याची धमकी वडगावशेरीतील अय्यप्पा मंदिराच्या कमानीजवळ डिलिव्हरी बॉयकडून मोबाइल फोन जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना घडली. आरोपीने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जुबेर नावाच्‍या एकावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरज कुमार फराकटे (वय 25, रा. झारा पीजी, सोमनाथनगर, वडगाव शेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेवनगर, वडगाव शेरी येथील अय्यप्पा मंदिराच्या कमानीच्या आत ही घटना घडली. आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून त्यांच्या शर्टच्या खिशातील 15 हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *