Headlines

नागनहळ्ळी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिवाळीची भेट




आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना सण साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागत असताना, गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा प्रयत्न नागनहळ्ळी येथील आश्रमशाळेच्या संस्थाचालकांनी केला आहे. दिवाळीच्या निमित्ताने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप केले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फराळ देण्यात आला. अक्कलकोट तालुक्यात दुष्काळाचे सावट असल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली आहे. विशेषतः भटक्या-विमुक्त समाजासह अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. संस्थेच्या वतीने यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. वैयक्तिक आनंदाचे प्रसंग सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणण्याची भूमिका संस्थेने जपली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मदत मिळण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशीलता जपण्याचा आदर्शही निर्माण होत आहे. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव जावेद पटेल होते. यावेळी अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्याम मोरे, भाऊ कापसे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आय. एम. मुजावर उपस्थित होते. शंभूलिंग बशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. मनोज जगताप यांनी सूत्रसंचालन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *