![]()
सांगोला जगात क्रांतीचे आणि कर्तृत्वाचे बीज केवळ शिक्षकच पेरू शकतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, परमपूज्य साने गुरुजी यांच्यासारख्या अनेक गुरुजनांचे प्रेरणादायी दाखले देत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात सुद्धा पाठीवर शाबासकीची थाप टाकून स्वतःच्या आदर
.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्कच्या जीवनशैलीचे वर्णन करत कर्तृत्वसंपन्न विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या गुरुजनांचे विशेष कौतुक केले. यावेळी प्रमुख पाहुणे उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील म्हणाले, शिक्षण आणि सहकार ही व्यवस्था समाजासाठी उपयुक्त असून, सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून या ग्रुपने उभे केलेले कार्य आमच्यासाठी देखील प्रेरणादायी आहे. हीच प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या मराठवाड्यात विशेषतः लातूर धाराशिव भागात देखील असे कार्य उभे करू. सुरुवातीला सूर्योदय समूहातील सर्व संस्थांचे संस्थापक आणि एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिल इंगवले यांनी प्रास्ताविकात एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन या संस्थांच्या भक्कम आर्थिक प्रगतीचा लेखाजोगा मांडला. सूर्योदयच्या अनेक सामाजिक उपक्रमांचा उल्लेख केला. सूर्योदय परिवाराच्या वतीने सांगोल्यात दरवर्षी व्यापक स्वरूपात ‘शिक्षक दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर आणि मोहोळ या चार तालुक्यातील काही गुणवंत शिक्षक आणि आदर्श शाळांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परमपूज्य राजमाता अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन सांगोला येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ‘शिक्षक दिन’ सोहळ्यासाठी शिक्षक, शिक्षिका यांच्यासह उपस्थितांची गर्दी झाली होती. या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्यातील ज्येष्ठ नेते जयसिंग पाटील, सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ. बंडोपंत लवटे, उपाध्यक्ष जगन्नाथ भगत, सुभाष दिघे, पंढरपूरचे उपसभापती देशमुख, उद्योजक अरविंद केदार, चेअरमन अर्चना इंगवले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शिक्षक घडवतात उद्याचे नेतृत्व : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका केवळ ज्ञानदानापुरती मर्यादित नसते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिद्द, सामाजिक भान आणि नैतिक मूल्ये रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करतात. एका शिक्षकाच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून अनेक पिढ्यांचे भविष्य घडू शकते. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता न राहता त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची समाजाची कायमस्वरूपी भावना असली पाहिजे. सामाजिक उपक्रमांतून हजारो माणसे जपली शिक्षक दिन कार्यक्रमासारखे विविध प्रकारचे सन्मान सोहळे, व्यापक स्वरूपातील रक्तदान शिबिरे, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे, वृक्ष संगोपन मोहीम, ग्रामीण भागातील महिलांचे तीर्थयात्रा दर्शन कार्यक्रम अशा अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे आजवर हजारो माणसे सूर्योदयने जोडली आहेत. सूर्योदय मॉल, दूध विभाग आणि सूर्योदय अर्बन व एलकेपी मल्टीस्टेटसारख्या वित्तीय संस्था ग्राहकांचा विश्वास जपत आहेत.