Headlines

'गोकुळ'च्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट!:उद्याच होणार निवडणूक, मात्र शासन नियुक्त 4 सदस्यांचे मतदान वेगळे ठेवणार; न्यायालयाचा निर्णय




कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर चार शासन नियुक्त संचालक नेमण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयाच्या विरोधात आज कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता न्यायालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, उद्या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच गोकुळची निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये आधीच निवडून आलेले 25 सदस्य आणि शासनाने नव्याने नियुक्त केलेले 4 सदस्य असे सर्वजण मतदानाचा हक्क बजावतील. मात्र, शासन नियुक्त या चारही सदस्यांचे मतदान वेगळे ठेवले जाणार आहे. मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण उद्या होणाऱ्या या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत पारदर्शकता राहावी, यासाठी संपूर्ण मतदान प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकालही जाहीर केला जाणार असून गोकुळचा नवा अध्यक्ष उद्याच निवडला जाईल. अंतिम निकाल न्यायालयाच्या अधीन दरम्यान, राज्य शासनाच्या या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी न्यायालयाने तूर्तास फेटाळून लावली आहे. मात्र, शासनाचा हा अध्यादेश योग्य की अयोग्य, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या या संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ही न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे गोकुळमध्ये नक्की कोणाची सत्ता येणार, याची धाकधूक आता वाढली आहे. न्यायालयात नेमके काय झाले? गोकुळ दूध संघावर शासन नियुक्त संचालक नेमण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला समविचारी आघाडीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. राज्यपालांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेला हा वटहुकूम रद्द करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. त्याचवेळी, समविचारी आघाडीने नोटीस पाठवल्याबाबत न्यायालयात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत महायुतीनेही एक याचिका दाखल केली होती. या सर्व प्रकरणांशी संबंधित एकूण तीन याचिकांवर आज (9 नोव्हेंबर) औरंगाबाद खंडपीठात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, समविचारी आघाडीच्या बाजूने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. “सरकारला अध्यादेशाद्वारे असा निर्णय लागू करता येत नाही. सरकार आपल्या ताकदीच्या जोरावर कृत्रिमरीत्या बहुमत आणण्याचा प्रयत्न करत असून, हा अध्यादेश म्हणजे सहकार क्षेत्राशी चाललेला खेळ आहे,” असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड जुन्याच पद्धतीने व्हावी, अशी मागणी सिंघवी यांनी न्यायालयासमोर लावून धरली. दुसरीकडे, राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद करत या अध्यादेशाचे समर्थन केले. “राज्यसभेत जर नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकतात, तर मग सहकारी संस्था किंवा तत्सम संस्थांमध्ये त्यांना मतदानाचा अधिकार का नसावा?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. “सरकारने काढलेला अध्यादेश किंवा केलेला कायदा यात काहीही चुकीचे नाही,” असा दावा करत समविचारी आघाडीची याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी रोहतगी यांनी न्यायालयाकडे केली. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. गोकुळवर प्रशासक आणणे हे सरकारचे सूडबुद्धीचेच राजकारण:कोल्हापुरात संघर्ष मोर्चातून सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल गोकुळ दूध संघावरील शासनाच्या हस्तक्षेपाविरोधात आणि ५ अतिरिक्त संचालकांच्या नियुक्तीविरोधात आज कोल्हापुरात काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या ‘संघर्ष मोर्चा’त काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि घणाघाती भाषण केले. या भाषणात त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जातीवादाचा आणि घराणेशाहीचा आरोप करत थेट हल्लाबोल केला. तसेच, महायुती सरकारने गोकुळमध्ये सूडबुद्धीने प्रशासक आणल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. वाचा सविस्तर ही देखील बातमी वाचा.. ‘तुमची संस्थाने उद्ध्वस्त होत आहेत, म्हणून ही टीका’:’गोकुळ’वरून प्रवीण दरेकरांचा पलटवार; म्हणाले- राजकीय दुकानदारी सुरू ठेवण्यासाठीच विरोधकांचा खटाटोप गोकुळ दूध संघावरील शासनाच्या हस्तक्षेपाविरोधात आणि ५ अतिरिक्त संचालकांच्या नियुक्तीविरोधात आज कोल्हापुरात काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या ‘संघर्ष मोर्चा’त काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि घणाघाती भाषण केले. या भाषणात त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जातीवादाचा आणि घराणेशाहीचा आरोप करत थेट हल्लाबोल केला. तसेच, महायुती सरकारने गोकुळमध्ये सूडबुद्धीने प्रशासक आणल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *