Headlines

लासूर स्टेशन येथे पारधी कुटुंबांना हक्काचा निवारा:साहित्य वाटप, कुटुंबांना कायमस्वरूपी घरांची व्यवस्था होणार




लासूर स्टेशन येथील रेल्वे गेट परिसरात वास्तव्यास असलेल्या पारधी समाजातील गरजू कुटुंबांच्या जीवनाला नवी दिशा देण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी पुढाकार घेतला आहे. या कुटुंबांना कायमस्वरूपी घरांची व्यवस्था करून देण्याबरोबरच त्यांच्या मूलभूत गरजांची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबांना नव्या संसाराची सुरुवात करता यावी यासाठी घरगुती वापराची भांडी, किराणा साहित्य आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. केवळ तात्पुरती मदत न करता या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कुटुंबांना सुरक्षित निवारा, मुलांच्या शिक्षणाची सोय, आरोग्य सुविधा आणि दैनंदिन गरजांसाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. समाजातील वंचित घटकांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. हक्काचे घर, मुलांच्या शिक्षणाची हमी आणि सुरक्षित भविष्याची आशा यामुळे पारधी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. मदतीच्या माध्यमातून या कुटुंबांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *