Headlines

Prakash Ambedkar Accuses RSS Members in Pune Arms Trafficking Case


पुणे येथील खडकी दारूगोळा कारखान्यातून चोरीला गेलेले 44 हजारांहून अधिक जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एका आंतरराज्यीय शस्त्र आणि दारूगोळा तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश करत ही कारवाई एसटीएफच्या मोहिमेदरम्यान करण्यात आली. या शस्त्र तस्करीमध्ये राष्ट्र

.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून सांगत आलो आहे की, आरएसएस ही एक देशविरोधी संघटना आहे. नागपूरमधील विजयादशमी सोहळ्यादरम्यान आरएसएसचे शस्त्रपूजन म्हणजे दलितांना धाक दाखवण्याच्या आणि धमकावण्याच्या ऐतिहासिक प्रथेचे प्रतिबिंब आहे; तसेच ते अशा शस्त्रांचे सार्वजनिक प्रदर्शन आहे, जी केवळ देशाच्या सशस्त्र दलांकडे असणे अपेक्षित असते.

आरएसएसवर पुन्हा बंदी का घालू नये?

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतविरोधी कारवाया करणाऱ्या आरएसएसवर पुन्हा बंदी का घातली जाऊ नये? किंबहुना, यावेळी त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी का घालण्यात येऊ नये? राहुल गांधी आरएसएसच्या त्या ‘अभिव्यक्ती आणि विचारसरणी’चे रक्षण का करू इच्छित आहेत, जी जातीयवादी, दलितविरोधी, आदिवासीविरोधी, अल्पसंख्याकविरोधी, संविधानविरोधी आणि देशविरोधी आहे? प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नका. आवाज उठवा आणि प्रश्न विचारत राहा.जय भीम! जय संविधान! जय भारत!

राहुल गांधीचा व्हिडिओही केला पोस्ट

पुण्यातील खडकी दारूगोळा कारखान्यातून काडतुसे चोरीला गेल्याच्या घटनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्तींच्या अटकेवरून आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य करत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

हे ही वृत्त वाचा

नागपूर हादरले:दिवाळीसाठी घरी आलेल्या शिक्षक दाम्पत्याची गळफास घेत आत्महत्या, कारण अस्पष्ट

महिन्याभरापूर्वीच लग्न केलेल्या एका शिक्षक दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना नागपूरच्या बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेसा येथील रेवतीनगर भागात घडली आहे. सोनाली (35) आणि मनीष प्रल्हाद गणवीर (38) असे आत्महत्या केलेल्या मृत दाम्पत्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली आणि मनीष यांनी 31 ऑगस्ट रोजी कोर्ट मॅरेज केले होते. दोघांचेही यापूर्वी विवाह झाले होते, परंतु कौटुंबिक वादानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. दोघेही गडचिरोलीतील एका खाजगी शाळेत शिक्षक असल्याने त्यांची ओळख झाली होती. दोघे वेगवेगळ्या जातीचे असले तरी ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी 31 ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा विवाह केला. लग्नानंतर ते गडचिरोलीतच राहत असून, नागपुरातील मनीषच्या वडिलांच्या घरी ते अधूनमधून येत होते. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.