Headlines

कला-क्रीडा रसिकांची प्रतीक्षा संपली; सांस्कृतिक भवनासह जलतरण तलाव सज्ज:अकोल्याच्या वैभवात पडणार भर, 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण



सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक वारसा लाभलेल्या अकोला शहराच्या वैभवात भर घालणारे भव्य सांस्कृतिक भवन आणि जलतरण तलाव आता लोकार्पणासाठी सज्ज झाले आहेत. अकोल्यातील कला व क्रीडाप्रेमींसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या प्रकल्पांचे, तसेच शहर वाहतूक बस सेवेसह विविध

.

दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा, माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या पुढाकाराने कामांची पायाभरणी झाली होती. मध्यंतरीच्या काळात काही कारणांमुळे हे काम रखडले होते. मात्र, आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाकडून विशेष निधी खेचून आणला. रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली. सांस्कृतिक भवन आणि क्रीडा संकुलाचे काम पूर्णत्वास नेले. दुसरीकडे, अकोला पंचक्रोशीतील नागरिकांच्या दळणवळणाची सोय व्हावी, यासाठी खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्र सरकारकडून विशेष निधी उपलब्ध केला आहे. अकोला महानगरपालिकेमार्फत लवकरच अद्ययावत शहर बससेवा जनतेच्या सेवेत दाखल होणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसाद पाटील, शरद जावळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तयारीचा आढावा घेत आहेत.

या कामाची आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, माजी महापौर विजय अग्रवाल, जयंत मसने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता मृणाली ढिगारे, अनिल गिरी, रणजित खेडकर, गिरीश जोशी, पवन महल्ले, विवेक भरणे, आरती घोगलिया, निकिता देशमुख, हर्षद भांबरे, प्रकाश घोगलिया, पुरुषोत्तम मालानी, संजय मालानी, यश मालानी आदींनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या वेळी आमदार रणधीर सावरकर यांनी इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. आवश्यक सूचना केल्या.

दिवंगत नेते राम जाधव, बाबासाहेब धाबेकर यांच्यासह स्थानिक कलावंतांचे स्मरण केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली क्रीडा व कला रसिकांची इच्छा आता पूर्ण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा राजेश्वर नगरीत दिमाखात पार पडणार आहे.

छायाचित्र, वनविभागाच्या कलाकृतींचे भरणार प्रदर्शन लोकार्पणाच्या मुख्य सोहळ्याचे औचित्य साधून सांस्कृतिक भवनात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये अकोल्यातील ‘फोटोग्राफर असोसिएशन’च्या वतीने स्थानिक छायाचित्रकारांच्या दर्जेदार छायाचित्रांचे भव्य कलादालन उभारण्यात येणार आहे. यासोबतच वनविभागाच्या वतीने अकोला परिसरातील जैवविविधता व वनसंपदेवर आधारित विशेष कलाकृतींचे प्रदर्शनही रसिकांसाठी खुले केले जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *