Headlines

26/11 दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे मराठवाड्यापर्यंत:18 व्या स्मृतिदिनापूर्वी मोठा खुलासा




मुंबईला हादरवून सोडणाऱ्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याला यंदा १८ वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजला असला तरी, याचे थेट धागेदोरे आता मराठवाड्यापर्यंत पोहोचले आहेत. या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानच्या कराची येथील कंट्रोल रूममधून दहशतवाद्यांना अत्यंत अचूक आणि हिंदीत निर्देश देणारा मुख्य हँडलर हा मराठवाड्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. अबू जिंदाल असे या हँडलरचे नाव असून, या खळबळजनक खुलाशामुळे १८ व्या स्मृतिदिनापूर्वी देशाच्या सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा हाय अलर्टवर आल्या आहेत. कराची कंट्रोल रूममधून हिंदीत सूचना २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत घुसलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून सातत्याने फोनवरून सूचना दिल्या जात होत्या. हॉटेल ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊसमध्ये दहशतवाद्यांना कुठे जायचे, काय करायचे आणि कोणाला मारायचे, याचे थेट निर्देश कराचीतील कंट्रोल रूममधून दिले जात होते. विशेष म्हणजे, हा हँडलर हिंदी भाषेत सूचना देत होता. तपासात असे निष्पन्न झाले आहे की, हा आवाज महाराष्ट्रातीलच एका व्यक्तीचा होता. १८ व्या स्मृतिदिनापूर्वी पुन्हा खळबळ यंदा २६/११ च्या या काळ्या दिवसाला १८ वर्षे पूर्ण होत आहेत. तब्बल दीड तपानंतर या हल्ल्याचे थेट कनेक्शन मराठवाड्याशी जोडले गेल्याने सुरक्षा यंत्रणांसह राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर मुद्दा मानला जात आहे. स्थानिक पातळीवर तपास यंत्रणांचे रडार या खुलाशामुळे संपूर्ण मराठवाड्यातील स्लीपर सेल्स तसेच जुन्या दहशतवादी नेटवर्कच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. या प्रकरणाचे स्थानिक धागेदोरे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मराठवाड्यातून यापूर्वीही अनेक तरुणांना दहशतवादी संघटनांनी भडकावल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर तपास यंत्रणांचे लक्ष पुन्हा एकदा वाढले आहे.
————– हेही वाचा.. 26/11 हल्ल्यावेळी कराचीतून बोलणारी ती व्यक्ती महाराष्ट्राची:उज्ज्वल निकम यांचा खळबळजनक दावा मुंबई3 तासांपूर्वी

मुंबईवरील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याला यंदा १८ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील आणि राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. हल्ल्यादरम्यान पाकमधील कराची कंट्रोल रूममधून दहशतवाद्यांना सूचना देणाऱ्या हँडलर्समध्ये एक जण महाराष्ट्रातील होता, असा मोठा दावा त्यांनी एका विशेष मुलाखतीत केला आहे. हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी दहशतवादी भारतीय वृत्तवाहिन्यांशी थेट फोनवरून बोलत होते. मुंबईत आलेले सर्व दहा दहशतवादी पाकिस्तानी पंजाबी होते. त्यांना अस्खलित हिंदी बोलता येत नव्हते. त्यामुळे माध्यमांशी नेमके काय बोलायचे, याचे धडे त्यांना कराचीतून दिले जात होते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *