Headlines

'माझ्या विभागात काय चाललंय, ते इतरांना सांगण्याची गरज नाही':पालघर MIDC प्रकल्पावरून उदय सामंत आणि गणेश नाईक यांच्यात जुंपली; सामंतांचे प्रत्युत्तर




पालघरमधील भादवे-उसरणी येथील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पावरून वनमंत्री गणेश नाईक आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे. जिल्ह्यात एखादा मोठा प्रकल्प येत असेल, तर त्याची माहिती प्रथम पालकमंत्र्यांना मिळायला हवी, अशी जाहीर नाराजी व्यक्त करत गणेश नाईकांनी सामंत यांच्यावर निशाणा साधला होता, ज्याला आता उदय सामंत यांनीही सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. उदय सामंत म्हणाले, गणेश नाईक यांच्याकडे वनविभाग आहे. आता वनविभागात काय चालले आहे, हे मला सांगावे असे अपेक्षित नाही. तसे माझ्या विभागात मी काय करावे हे मी मुख्यमंत्र्यांना, माझे नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आहे. नाहीतर प्रत्येक मंत्रालयात निर्णय घेताना प्रत्येक मंत्र्याला सांगावे लागेल. तशी काही व्यवस्था मंत्रालयात नाही. त्यापुढे जाऊन मी सांगेल की ते ज्येष्ठ आहेत, त्यांचे देवेंद्र फडणवीस साहेब आकु शकतात. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना सांगावे, असे सामंत यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, माझ्या विभागात काय चालले आहे हे माझ्या विभागातील प्रशासकीय टीमने ठरवावे. या प्रकल्पाला काही ठिकाणी विरोध आहे. त्यामुळे प्रकल्पावर प्रश्न निर्माण झाला आहे. मी अनुभवानेही आणि वयानेही त्यांच्या पेक्षा लहान आहे. त्यांनी या शंका मुख्यमंत्र्यांना भेटून दूर कराव्यात, असा सल्लाही सामंत यांनी दिला आहे. दरम्यान, दोन्ही शिवसेना एकत्र आल्यावर सर्वात जास्त आनंद मला होईल, असे विधान शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, ओमराजे काय बोलले हे महत्त्वाचे नाही. मात्र आमच्या पक्षाची एक सिस्टम आहे. आमच्या पक्षात जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही एकनाथ शिंदेंकडे दिले आहेत. त्यामुळे पक्षाच्या धोरणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *