Headlines

सांगली जिल्हा बँकेवर काँग्रेसचा झेंडा:22 वर्षांनंतर अध्यक्षपद मिळवले, भाजपला धक्का तर शिंदे सेनेच्या तानाजी पाटलांची उपाध्यक्षपदी वर्णी




सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध पार पडली. या निवडीत काँग्रेसने भाजपला धक्का देत अध्यक्षपदावर बाजी मारली. काँग्रेसचे महेंद्र लाड यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष झाले. तब्बल 22 वर्षांनंतर सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचा नेता विराजमान झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी आणि भाजप महायुती यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली होती. दोन्ही गटांना संचालकपदाच्या निवडीत समान जागा मिळाल्याने अध्यक्षपदाची निवड कोणाच्या बाजूने जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. अखेर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत राजकीय समीकरणे जुळली आणि काँग्रेसने अध्यक्षपद मिळवण्यात यश मिळवले. 22 वर्षांनंतर काँग्रेसला अध्यक्षपद सांगली जिल्हा बँकेवर तब्बल 22 वर्षांनंतर काँग्रेसचा अध्यक्ष निवडून आल्याने या निवडीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेस नेते महेंद्र लाड यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हा बँकेत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने महत्त्वाची पायरी गाठली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीत काँग्रेसला साथ मिळाल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. संचालक मंडळातील संख्याबळ समान असतानाही राजकीय जुळवाजुळव आणि अपक्ष संचालकाची भूमिका निर्णायक ठरली. त्यामुळे या निवडीकडे जिल्ह्यातील राजकीय सत्तासमीकरणांच्या दृष्टीने पाहिले जात आहे. उपाध्यक्षपदी शिंदे गटाच्या तानाजी पाटील बँकेच्या उपाध्यक्षपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजी पाटील यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि उपाध्यक्षपद शिवसेनेकडे गेल्याने दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधल्याचे चित्र दिसून आले. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध झाल्याने निवड प्रक्रियेतील राजकीय समझोता स्पष्ट झाला. सातारा जिल्हा बँकेच्या निवडीनंतर सांगलीतही वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येत पदांची विभागणी केल्याचे दिसून आले. जिल्हा बँकेच्या सत्तास्थापनेत स्थानिक राजकीय समीकरणांना महत्त्व मिळाले. संचालक मंडळातील संख्याबळ काय? सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत विविध पक्ष आणि आघाड्यांचे उमेदवार निवडून आले. यापूर्वी 15 संचालक बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित 6 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला 6 जागा, भाजपच्या नेतृत्वाखालील गटाला 5 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पॅनेलने 4 जागा जिंकल्या. शिवसेनेला 3, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या, तर माजी खासदार संजय काका पाटील अपक्ष म्हणून निवडून आले. या निकालामुळे कोणत्याही एका गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. अपक्ष संजय काका पाटील ठरले किंगमेकर संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या नेतृत्वाखालील गटांना प्रत्येकी 10 जागा मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी 11 संचालकांचे संख्याबळ आवश्यक होते. त्यामुळे अपक्ष निवडून आलेले माजी खासदार संजय काका पाटील यांची भूमिका निर्णायक बनली होती. अध्यक्षपदाच्या निवडीत त्यांचा पाठिंबा कोणाला मिळणार, यावर बँकेच्या सत्तेचे गणित अवलंबून होते. अखेर अध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्याने संख्याबळाच्या संघर्षात काँग्रेसने बाजी मारली. या निकालामुळे सांगली जिल्हा बँकेच्या राजकारणात भाजपला धक्का बसला असून, आगामी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींसाठीही या सत्ताबदलाकडे महत्त्वाने पाहिले जात आहे. —————————————————— हेही वाचा… सोनिया गांधींच्या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा दावा: शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतच फाडल्या सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती; उद्धव ठाकरेंवरही शरसंधान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा अत्यंत अवमानजनक उल्लेख करण्यात आल्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय निरुपम, शायना एन. सी. आणि महिला नेत्यांनी थेट कॅमेऱ्यांसमोर या पुस्तकाची आक्षेपार्ह पाने टराटरा फाडून तीव्र निषेध नोंदवला. “सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरेंना हा अपमान मान्य आहे का?” असा सणसणीत सवाल शिवसेना नेत्यांनी यावेळी उपस्थित केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *