Headlines

कातरवेल वनक्षेत्रात श्रमदानातून पाच बंधाऱ्यांची उभारणी:जलस्रोतांना बळ, वन्यजिवांना पाण्याचा आधार; वन विभाग व ग्रामस्थांनी घेतला पुढाकार



बागलाण तालुक्यातील कातरवेल वनक्षेत्रात वन्यजिवांसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करण्यासाठी वन विभाग आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून पाच वनराई बंधारे उभारले आहेत. शनिवारी (दि. २१) मौजे कातरवेल येथील कक्ष क्रमांक १५३, ताहाराबाद परिमंडळातील दुर्गम वनक्षेत्र

.

सध्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यजिवांना मानवी वस्तीकडे किंवा शेतांच्या दिशेने धाव घ्यावी लागत आहे. यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका वाढतो. ही समस्या लक्षात घेऊन वन विभागाने ग्रामस्थांच्या सहकार्याने जलसंधारणाचा उपक्रम हाती घेतला. ओढ्यांतील पाणी अडविण्यासाठी दगड, माती आणि परिसरातील उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा वापर करून बंधारे उभारण्यात आले. पाणी बाजूने किंवा खालून वाहून जाऊ नये, यासाठी ओढ्याच्या तळाशी योग्य पद्धतीने साहित्य भरून मजबूत रचना तयार करण्यात आली. त्यामुळे पावसाचे तसेच ओढ्यातील पाणी साठविण्यास आणि जमिनीत मुरविण्यास मदत होणार आहे. उपवनसंरक्षक राकेश सेपट यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक (मालेगाव) शेखर तनपुरे यांच्या सहकार्याने आणि वनपरिक्षेत्र अधिकारी (ताहाराबाद प्रादेशिक) ज्ञानेश्वर शर्माळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वनमजूर आणि कातरवेल येथील ग्रामस्थांनी दिवसभर श्रमदान केले. यामध्ये तहाराबादचे वनपाल नीलेश कोळी, वनरक्षक संदीप गायकवाड, वनरक्षक वामन पवार, १० वनमजूर आणि ग्रामस्थ सहभागी झाले.

बंधाऱ्यांचे तीन महत्त्वाचे लाभ { जलसाठा संवर्धन : ओढ्यांतील पाणी अडवून जमिनीत मुरविण्यास आणि भूजल पातळी वाढविण्यास मदत. { वन्यजिवांना आधार : पाणीटंचाईच्या काळात पशू-पक्ष्यांना जंगलातच पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत. { पर्यावरणीय संतुलन : नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेचे संवर्धन होण्यास हातभार.

भूजल पातळीला फायदा ^दुष्काळामुळे जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्याने वन्यजिवांचे हाल होत होते. ही गरज लक्षात घेऊन वन विभाग आणि ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून पाच वनराई बंधारे उभारले. यामुळे भूजल पातळी वाढण्यासही मदत होईल. – ज्ञानेश्वर शर्माळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, तहाराबाद प्रादेशिक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *