Headlines

Supriya Sule Dismisses Sharad Pawar Retirement Rumors; Maharashtra Politics


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि त्यानंतर पक्षाने भाजपप्रणित ‘एनडीए’मध्ये (NDA) सहभागी व्हावे, यावर पक्षात मंथन सुरू असल्याच्या चर्चेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली

.

नेमका का वाद पेटला?

एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एनडीए प्रवेशासाठी पक्षात एका नव्या समीकरणाची चाचपणी सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता. शरद पवार येत्या 12 डिसेंबर रोजी 86 वर्षांचे होत असून ते 6 दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपदापासून अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत.

निवृत्तीचा कथित फॉर्म्युला

वयाच्या या टप्प्यावर स्वतः शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय भूमिकेला मोठा छेद जाईल. ही कोंडी टाळण्यासाठी शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि त्यानंतर खा. सुप्रिया सुळे व ज्येष्ठ नेते जयंत पाटील आदींनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा, अशी चर्चा पक्षात सुरू असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता. तसेच पक्षाच्या काही नेत्यांनी यासंदर्भात भाजप नेतृत्वाशी चर्चा केल्याचेही वृत्तात नमूद होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोनवरील त्या वाक्यानेही चर्चेला हवा

काही दिवसांपूर्वी शरद पवार राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे (खोकला, कफ आणि अशक्तपणा) त्यांना आधी पुण्यात आणि नंतर मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना फोन केला होता. या संभाषणादरम्यान मोदींनी “आपण विश्रांती घ्या, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू,” असे म्हटले होते. प्रकृतीच्या काळजीपोटी हे वाक्य बोलले गेले असले, तरी राजकीय वर्तुळात त्यातून पवारांच्या निवृत्तीचे संकेत शोधले गेले आणि या चर्चांना अधिकच उधाण आले.

ज्यांनी तुम्हाला मदत केली, त्यांनाच आराम करण्याचा सल्ला देताय? लाज वाटली पाहिजे! –संजय राऊत

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या बातमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही अत्यंत तिखट शब्दांत संताप व्यक्त केला आहे. शरद पवारांचे संपूर्ण आयुष्य धर्मांध शक्तींविरोधात लढण्यात आणि फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवण्यात गेले आहे. सत्तेत जाण्याची घाई झालेल्या काही लोकांकडून हे विचार गुंडाळण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. शरद पवार असे कधीही करणार नाहीत.

स्वपक्षातील नेत्यांना खडेबोल

ज्यांनी तुम्हाला राजकारणात मोठे केले आणि मदत केली, त्यांचाच पक्ष फोडून आता त्यांनाच ‘तुम्ही आराम करा’ असा सल्ला देताय, याची लाज वाटली पाहिजे, असा घणाघात राऊत यांनी केला. तसेच, सुप्रिया सुळे या प्रखर फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या असल्याने त्या कधीही एनडीएसोबत जाणार नाहीत, असा ठाम विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावल्यामुळे शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीवरून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

—————————————————

हेही वाचा…

विलीनीकरण नको, तरीही महायुतीत या!: भाजपचा शरद पवारांसमोर नवा पर्याय? दिवाळीत गुप्त बैठकांचा दावा; राष्ट्रवादीच्या सत्तासमीकरणात मोठा ट्विस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू असल्या, तरी आता भाजपने थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर (शरदचंद्र पवार गट) एक नवा आणि अनपेक्षित पर्याय ठेवल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले नाही, तरीही शरद पवार यांच्या पक्षाला स्वतंत्र चौथा घटक म्हणून एनडीए (NDA) आणि महाराष्ट्रातील महायुतीमध्ये सहभागी करून घेण्यास भाजप अनुकूल असल्याची चर्चा सुरू आहे. दिवाळीच्या काळात शरद पवार गटाच्या नेतृत्वाने राज्यातील भाजप नेत्यांसोबत गुप्त बैठका घेतल्याचा दावाही करण्यात येत असून, यामुळे राज्याच्या सत्तासमीकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.