Headlines

राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांनाही अग्रीम रक्कम नक्की मिळेल:शेतकऱ्यांकडे तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपन्यांची माहिती अमित शहांना दिली- कृषिमंत्री भरणे




दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत राज्यातील सुमारे 97 लाख शेतकऱ्यांना ही अग्रीम रक्कम मिळाली आहे. नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ज्या उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम ई-केवायसी, सामायिक क्षेत्र किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम नक्की दिली जाईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे. दत्तात्रय भरणे म्हणाले की, नमो शेतकरी सन्मान योजनेच्या प्रलंबित हप्त्याची फाईल मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आली असून ती रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. दुष्काळी परिस्थितीत ज्या फायनान्स कंपन्या कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहेत किंवा बळजबरी करत आहेत, त्यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिली आहे. फायनान्स कंपन्यांनी माणुसकी ठेवून शेतकऱ्यांना सहकार्य करावे आणि वसुलीसाठी सक्ती करू नये, अन्यथा सरकारला या कंपन्यांबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दिवंगत नेते वडकुते यांच्या अंत्यविधीसाठी ते आले होते; त्यांच्या निधनामुळे राज्याने एक चांगला नेता गमावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सुधारित फेरप्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचे काम सुरू दत्तात्रय भरणे म्हणाले की, केंद्र सरकारने नुकतेच एनडीआरएफच्या नुकसान भरपाईच्या दरांमध्ये वाढ केली आहे.या वाढीव दरांनुसार शेतकऱ्यांना जास्तीची मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने आधी पाठवलेल्या प्रस्तावात दुरुस्ती करून सुधारित फेरप्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचे काम सुरू आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने कृषी, जलसंधारण आणि ग्रामविकास विभागांच्या माध्यमातून तात्पुरत्या आणि दीर्घकालीन योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही दत्तात्रय भरणे म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये, म्हणून चाऱ्याच्या बियाण्यांपासून शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. जून महिन्यापर्यंत दुष्काळाचे संकट संपेपर्यंत सरकार कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. हे ही वृत्त वाचा पवारांचा पक्ष भाजपची बी टीम नाही, डिलिमिटेशनवर कोणताही सौदा नाही:संस्कृतीप्रमाणे असणाऱ्या खाद्यावर बंदी योग्य नाही; मीरा-भाईंदर वादावर संजय शिरसाटांची भूमिका कोणताच पक्ष कोणाची बी टीम नसतो, प्रत्येकाचे आपले वेगळे अस्तित्व आहे आणि त्या पद्धतीने ते काम करत असतात. एखाद्या पक्षाला विरोध किंवा पाठिंबा दिला म्हणून त्यावर तातडीने बोलणं योग्य नाही, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. अंजली आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या पक्षावर केलेल्या भाजपची बी टीम या टीकेवर ते बोलत होते. सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या केवळ बातम्या आहेत; त्यांनी स्वतः सांगितले आहे की आम्ही डिलिमिटेशन बिलला पाठिंबा देणार आहोत, याबदल्यात दुसरा असा काही सौदा झालेला नाही. शरद पवार राजकीय निवृत्ती घेतील असे वाटत नाही; त्यांची तब्येत बरी नसली तरी ते दुष्काळी भागाचे दौरे करत आहेत, असेही शिरसाट यांनी नमूद केले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *