![]()
ऑक्सफर्ड आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये व्याख्यानासाठी निघालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते सौरव दास यांना दिल्ली विमानतळावर रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेवरून अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आणि देशातील लोकशाहीवर बोलण्यासाठी जाणाऱ्या सुशिक्षित तरुणाला अडवून, पासपोर्टमधील त्रुटींचे निमित्त पुढे करणाऱ्या मोदी सरकारने विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांसारख्या बँक घोटाळेबाजांना मात्र व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन देशाबाहेर पळून जाण्यास मदत केल्याचा गंभीर आरोप दीपके यांनी केला आहे. अभिजीत दीपके म्हणाले की, लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स सारख्या मोठ्या विद्यापीठाने लेक्चर देण्यासाठी सौरभ दास यांना बोलावले होते. की जी कॉकरोच चळवळ आल्या भारतात झाली होती, ही संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली होती. कशा पडधतोनए महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रस्त्यावर चालून या चळवळीने यश मिळवले आणि केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मिळवला, यावर बोलण्यासाठी सौरभ दासला ऑक्सफोर्ड आणि लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्सने बोलावले होते. पण काल रात्री जेव्हा तो विमानतळावर गेला तेव्हा त्याला अडवण्यात आले आणि त्याला सांगितले की तुम्ही भारताच्या बाहेर नाही जाऊ शकत, आता सौरभ दास यांना अडवण्यामागे काय कारण आहे? तो क्रिमिनल आहे की त्याने बँक लुटली आहे? मला असे वाटते की सौरभकडून जर कोणती चूक झाली असेल तर ती म्हणजे त्याने कोणताही घोटाळा केलेला नाही. सौरभने लोकांना चुना लावला असता तर त्याला VIP ट्रीटमेंट दिली असती पुढे बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, जर सौरभने बँका लुटल्या असत्या, लोकांना चुना लावला असता तर त्याला व्हीआयपी क्ल्यरंस देण्यात आले असते जसे विजय मल्ल्याला देण्यात आले होते. हजारो कोटींचा घोटाळा करणारा विजय मल्ल्या, हा देशातून पळून जातो विमानतळावरून, त्याला मोदी सरकार अडवत नाही. आजही त्याच्याकडे 7 हजार कोटी बाकी आहेत. याला अडवण्यात नाही आले. सौरभची ही चूक झाली की त्याने चुना नाही लावला. दूसरा आहे नीरव मोदी, यांनी हजारो कोटींचा घोटाळा केला, पीएनबी बँकेला चुना लावला. सौरभने देखील असे केले असते तर त्याला देखील मोदी सरकारने व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन पळवून लावले असते. तिसरा आहे मेहुल चौकसी, याने सुद्धा असाच चुना लावला आहे देशातल्या बँकांना, जनतेला आणि हजारो कोटींचा घोटाळा करून हा सुद्धा पळून जातो. मोदी सरकार या चोरांची सरकार आहे अभिजीत दीपके यांनी पुढे म्हटले की, हे जे चोर लोक आहेत, यांना मोदी सरकार मदत करते, या तिन्ही लोकांकडून 58 हजार कोटी भारताला येणे बाकी आहे. मोदी सरकार यांच्यासाठी रेड कार्पेट टाकते. त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, तुम्हाला ज्या देशात जायचे तिथे जा. पण यांना प्रॉब्लेम कुठे होतो? सौरभ दास सारख्या लोकांमुळे. सौरभसारखा या देशातला शिकलेला युवक, ज्याला बाहेरच्या देशातील मोठे विद्यापीठ बोलण्यासाठी बोलावतात. सौरभ ऑक्सफोर्डमध्ये जाऊन महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर बोलणार होता. आपल्या देशातल्या लोकशाहीवर बोलणार होता, हे या मोदी सरकारला नको होते. मोदी सरकारला हे चोर पाहिजे. मोदी सरकार या चोरांची सरकार आहे. मोदी सरकार शिकलेल्या लोकांची सरकार नाही, असा आरोप दीपके यांनी केला आहे. सौरभ दासच्या पासपोर्टमध्ये त्रुटी असल्याचे कारण केले समोर सौरभ दासच्या पासपोर्टमध्ये गडबड असल्याचे कारण देण्यात आल्याची माहिती दीपके यांनी दिली आहे. सौरभचा पासपोर्ट 2019 मध्ये इश्यू करण्यात आला, तेव्हा कोणाची सरकार होती? त्यानंतर तो दोन वेळा बाहेर जाऊन आला, तेव्हा चुकीची माहिती नाही आढळून आली का? जेव्हा त्याने चळवळ केली, तो प्रसिद्ध झाला तेव्हाच चुकीची माहिती कशी काय आढळून आली? त्याची एवढी भीती का? हा देशातल्या प्रश्नांवर, महात्मा गांधींवर बोलणार होता, आंबेडकरांच्या विचारांवर बोलणार होता. हे नको आहे मोदी सरकारला. मोदी सरकारला फक्त हे चोर पाहिजे आहेत. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. CJP नेते सौरव दास म्हणाले- UK ला जाऊ दिले नाही:दिल्ली विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर रोखले, ऑक्सफर्ड युनियनने व्याख्यानासाठी बोलावले होते कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे नेते सौरव दास यांनी सोमवारी त्यांना UK ला जाण्यापासून रोखल्याचा आरोप केला. त्यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून सांगितले की, त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी जायचे होते; मात्र इमिग्रेशन काउंटरवरच त्यांना थांबवण्यात आले. मात्र, अधिकृत माहितीनुसार १ डिसेंबर रोजी ऑक्सफर्ड युनियनमध्ये पॅनेल चर्चा होणार होती. यात सहभागी होण्यासाठी सौरव दास यांना आमंत्रित करण्यात आले होते. वाचा सविस्तर
Source link
सौरभ दास यांना विमानतळावर रोखले:अभिजीत दीपके आक्रमक, म्हणाले- बँका लुटल्या असत्या तर त्यालाही VIP ट्रीटमेंट मिळाली असती