![]()
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात सोलापूर विभागातील २० महाविद्यालये आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेवक संयुक्त कृती समिती,
.
महाराष्ट्र शासनाने १ व २ जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १०-२०-३० ही आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे. मात्र, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे दरमहा दोन ते तीन हजार रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे माने यांनी सांगितले. तसेच १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत असलेल्या तसेच २००० ते २००३ दरम्यान अनुदान मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली.
कर्मचारी ११ वाजेपर्यंत आंदोलनामध्ये सहभागी राजाराम माने म्हणाले, प्रलंबित मागण्यांसाठी यापूर्वी ५ तारखेला शिक्षण संचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी शासनाला १३ तारखेपर्यंत बैठक घेण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, शासनाने कोणतीही बैठक आयोजित केली नाही अथवा कृती समितीशी चर्चा केली नाही. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, सोलापूर विभागातील २० महाविद्यालये आणि एका विद्यापीठातील कर्मचारी सकाळी ११ वाजेपर्यंत संपात सहभागी झाले होते.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करू शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी वारंवार संघर्ष करावा लागत आहे. शासनाने तातडीने बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत व मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा सेवक संयुक्त कृती समितीच्या आदेशानुसार यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजाराम तायाप्पा माने यांनी दिला.