Headlines

अनधिकृत नळजोडण्या तोडायला गेलेल्या पथकासमोर दगडफेक: संभाजीनगरच्या शालिमार हॉटेल, कट कट गेट ते पोलीस मेस रोड परिसरातील कारवाई आता पोलीस बंदोबस्तात होणार


छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत नळजोडण्या तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासमोर स्थानिकांमध्ये वाद झाला. त्यानंतर दगडफेक आणि हाणामारी झाली. त्यामुळे संबंधित भागातील कारवाई आता पोलीस बंदोबस्तात केली जाणार आहे.

.

शालिमार हॉटेल आणि कट कट गेट ते पोलीस मेस रोड परिसरात मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या तोडण्यासाठी पथक गेले होते. त्याचवेळी स्थानिकांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर दगडफेक व हाणामारीत झाले. यामुळे पथकासमोर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड यांच्या देखरेखीखाली विशेष पथक नेमण्यात आले आहे. मुख्य जलवाहिनीवरून घेतलेल्या अनधिकृत जोडण्यांमुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

परिसरातील तणाव लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने संबंधित भागातील कारवाई पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतरच करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कारवाईत पथकप्रमुख आणि कनिष्ठ अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता अक्षय डुकले, लाईनमन आणि नागरी मित्र पथकाचे रतन वाघ, किसन निकम, संतोष बनकर, नारायण फुके, स्वर्णसिंह परदेशी, जनार्दन सांगळे, जयेश मगरे, स्वप्नील पाईकडे, वैभव भटकर, ऋतिक वाघमारे, कुणाल कांबळे, तुषार पोटपिल्लेवार, रितेश परोचा आणि सागर गायकवाड उपस्थित होते.

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या हटवणे आवश्यक असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *