![]()
दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना खडकवासला परिसरात घडली. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे वय अंदाजे 65 वर्ष असून, तिची ओळ
.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक गणेश कांबळे यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार तरुणी सई किशोर अगरवाल (वय 20, रा. साचापीर स्ट्रीट, लष्कर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार तरुणी डोणजे परिसरातून खडकवासला गावाकडे निघाली होती. खडकवासला चौपाटीजवळ भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी ज्येष्ठ महिलेला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेची ओळख पटली नाही. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दिली. मृत्युमुखी पडलेली महिला फिरस्ती असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस चेवले तपास करत आहेत.
मोटारीची दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक
सहप्रवासी महिलेचा मृत्यू
भरधाव मोटारीने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिल्याची घटना खराडी परिसरात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रोहिणी भगवान भालेराव (वय 50, रा. पंचशीलनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात भालेराव यांचे दुचाकीस्वार पती भगवान (वय 60) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी मोटार चालक दत्ता धोंडिबा सूर्यवंशी (वय 25, रा. काळूबाईनगर, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भगवान भालेराव यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.