![]()
प्रतिनिधी | खुलताबाद तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीत रिक्त झालेल्या सरपंचपद तसेच प्रभाग क्रमांक १ मधील सदस्यपदासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल उत्सुकतेच्या वातावरणात अखेर जाहीर झाला. या निवडणुकीत सरपंचपदी गणेश दादाराव ठेंगडे यांनी विजय मिळवला, तर प्रभाग क्रमांक १ मधून सदस्यपदी अरुणा बाबासाहेब दांडेकर या विजयी झाल्या. मंगळवारी (२८ एप्रिल) मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत सुमारे ७५ टक्के इतके लक्षणीय मतदान केले. ज्या अखेरच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या लढतीत गणेश दादाराव ठेंगडे यांनी ८६८ मते मिळवत आपल्या प्रतिस्पर्धी मुनीर मन्नान शहा (७०३ मते) यांचा १६५ मतांच्या फरकाने पराभव केला. दरम्यान, प्रभाग क्रमांक १ मधील सदस्यपदासाठीची निवडणूकदेखील अत्यंत चुरशीची ठरली. अरुणा बाबासाहेब दांडेकर यांनी १७४ मते मिळवून आपल्या प्रतिस्पर्धी छायाबाई रुस्तुम दांडेकर (१६० मते) यांचा अवघ्या १४ मतांनी पराभव केला. नव्याने निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांकडून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
Source link
लोणी सरपंच पोटनिवडणुकीचानिकाल, गणेश ठेंगडे यांचा विजय:सदस्यपदी अरुणा दांडेकर यांची निवड, ७५ टक्के मतदान